शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

शहरात पुन्हा मुसळधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:04 AM

नाशिक : मान्सूनचा परतीचा प्रवास संथगतीने सुरू असल्यामुळे आॅक्टोबरमध्येही पावसाची ‘दम’धार हजेरी पहावयास मिळत आहे. मागील तीन दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, दिवसभर उकाडा आणि संध्याकाळपासून पावसाचा तडाखा असाच काहीसा अनुभव नाशिककर घेत आहे. अशा स्थितीत कोळशाचा निर्माण झालेला तुटवडा परिणामी वीज उत्पादनात झालेल्या घटमुळे होणाºया आपत्कालीन भारनियमनाचा ‘झटका’ नागरिकांना सहन करावा लागत आहे. रविवारी (दि.८) दुपारपासून उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागात ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट सुरू होताच महावितरणची ‘बत्ती गूल’ झाली.

नाशिक : मान्सूनचा परतीचा प्रवास संथगतीने सुरू असल्यामुळे आॅक्टोबरमध्येही पावसाची ‘दम’धार हजेरी पहावयास मिळत आहे. मागील तीन दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, दिवसभर उकाडा आणि संध्याकाळपासून पावसाचा तडाखा असाच काहीसा अनुभव नाशिककर घेत आहे. अशा स्थितीत कोळशाचा निर्माण झालेला तुटवडा परिणामी वीज उत्पादनात झालेल्या घटमुळे होणाºया आपत्कालीन भारनियमनाचा ‘झटका’ नागरिकांना सहन करावा लागत आहे. रविवारी (दि.८) दुपारपासून उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागात ढगांच्या गडगडाटासह विजांचा कडकडाट सुरू होताच महावितरणची ‘बत्ती गूल’ झाली.रविवारी दुपारपासून शहराच्या काही उपनगरीय भागांमध्ये काळे ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली. मुंबई नाक्यापासून पुढे शहराच्या मध्यवर्ती भागात संध्याकाळी साडेसहा वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली; तत्पूर्वी देवळाली कॅम्प, इंदिरानगर, पाथर्डी, वडाळागाव, आंबेडकरनगर, अशोकामार्ग आदी भागात पावसाने सलामी दिली होती. संध्याकाळी मुंबई नाका, सीबीएस, गंगापूररोड, कॅनडा कॉर्नर, गंगापूररोड, सातपूर, सिडको, पंचवटी, जुने नाशिक आदी परिसराला पावसाने झोडपून काढले. सुमारे अर्धा तास या भागात पाऊस सुरू होता.त्यानंतर उघडीपही अल्पवेळ होती, पुन्हा सव्वा सात वाजेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावल्याने रस्ते जलमय झाले. गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड आदी परिसराचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. अशोकामार्ग, वडाळागाव परिसरात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू होता.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आवक वाढली

शहरासह ग्रामीण भागामध्येही पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने पाण्याची आवक वाढली. यामुळे रविवारी सकाळपासून सुरू असलेला तीनशे क्यूसेकचा विसर्ग संध्याकाळी सहा वाजता वाढविण्यात आला होता. गोदापात्रात एकूण सहाशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून सुरू होता. धरण शंभर टक्के भरले असून जलसाठा पाच हजार ६३० दलघफू इतका आहे. गंगापूर समूहातील गौतमी, काश्यपी, आळंदी ही लहान धरणेही शंभर टक्के भरली आहेत.

२४ तासांत १५.९ मि.मी.

शनिवारी (दि.७) दुपारी साडेचार वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी पंधरा मिनिटांत ९.० मि.मी. इतका उच्चांकी पाऊस पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राने केली आहे. रात्री आठ वाजता पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली तेव्हा ४५ मिनिटांत ४.७ इतका पाऊस झाला. रविवारी पाच वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. सकाळपर्यंत २४ तासांत १५.९ मि.मी. इतका पाऊस शहरात झाला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपासून संध्याकाळपर्यंत १०.३ मि.मी. इतका पाऊस पडला होता. रविवारी साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत ७.० मि.मी. इतका पाऊस झाला.