नाशिक : अनलॉकनंतर जिल्हाअंतर्गत बसेस सुरू झाल्या, मात्र शहरातील बसेस सुरू होत नसल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लोकमतने केलेल्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी शहरातील काही महत्त्वाच्या मार्गांवर बसेस धावल्या. आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रस्त्यावर बसेस दिसू लागल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. पहिल्या दिवशी बसेसने एकूण ... फेऱ्या पूर्ण केल्या, तर पंचवटी-नाशिकरोड मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद दिसून आला.कोविडचा प्रादुर्भाव असल्याने या काळात प्रवासी वाहतूक बंद करण्याला प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळे गेल्या मार्च महिन्यापासून राज्य परिवहन महामंडळाची शहरांतर्गत बससेवा पूर्णपणे बंद होती. अत्यावश्यक सेवा आणि तातडीची गरज म्हणून बसेस सोडण्यात आल्या होत्या, परंतु तत्कालिक करारानुसार या बसेस सोडण्यात आल्या होत्या. आता शहरातील प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी गुरुवारपासून बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. महामंडळाने निमाणी येथून नाशिकरोड, श्रमिकनगर, उत्तमनगर, अंबड, विजयनगर आणि पाथर्डीगाव या मार्गावर बसेस सुरू करण्याची घोषणा महामंडळाने केली होती.प्रवाशांची संख्या आणि डिझेलचा याबाबी पुढे करीत राज्य परिवहन महामंडळाने बसेसेच्या मूळ व्यवसायातून मागे हटण्याची तयारी मानसिकता केली होती. त्यामुळेच कोरोनाच्या काळात बंद झालेल्या शहर बसेस यापुढे सुरू न करण्याची तयारी महामंडळाने चालविली होती. महामंडळाच्या या भूमिकेचा समाचार घेत ह्यलोकमतह्णने सर्वसामान्य प्रवाशांना हा वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचे परखडपणे मांडले होते. महापालिका बसेस सुरू करतील तेव्हा करतील निदान तोपर्यंत तरी महामंडळाने प्रवाशांना वाऱ्यावर सोडू नये, अशी जनभावना लोकमतच्या माध्यमातून मांडण्यात आली होती.
आठ महिन्यांनंतर रस्त्यांवर धावली सिटी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 12:46 AM
अनलॉकनंतर जिल्हाअंतर्गत बसेस सुरू झाल्या, मात्र शहरातील बसेस सुरू होत नसल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लोकमतने केलेल्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी शहरातील काही महत्त्वाच्या मार्गांवर बसेस धावल्या. आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रस्त्यावर बसेस दिसू लागल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. पहिल्या दिवशी बसेसने एकूण ... फेऱ्या पूर्ण केल्या, तर पंचवटी-नाशिकरोड मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद दिसून आला.
ठळक मुद्देलोकमतच्या लढ्याला आले यश : प्रवाशांचा प्रतिसाद, निमाणीपासून सिडको, सातपूर, नाशिकरोड, पाथर्डीगावापर्यंत बसफेऱ्या