शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

शहराने पांघरली धुक्याची दुलई

By admin | Published: September 27, 2015 12:22 AM

वातावरणात बदल : पावसाने पुन्हा घेतली विश्रांती

नाशिक : गणेश चतुर्थीनंतर शहरात सुरू झालेल्या पावसाने अचानकपणे विश्रांती घेतली असून, सध्या पहाटेच्या सुमारास शहर धुक्याची दुलई पांघरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. धुक्यात हरविलेले शहर साडेसहा वाजताच सूर्यकिरणांनी उजळून निघत असल्याचा अनुभव सध्या नाशिककर घेत आहे.शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. पहाटे शहराच्या विविध उपनगरांमध्ये दाट धुके व दवबिंंदू पडत आहे. अवघ्या अर्धा तास दाट धुके नागरिकांना पहावयास मिळते. पहाटेची झुंजूमुंजू होताच धुके हटू लागते आणि सूर्याची किरणे हळुवारपणे दाटलेल्या धुक्यातून शहरावर पडत आहेत; मात्र आठ वाजताच सूर्याची किरणे तीव्र होत असून, प्रखर ऊन नाशिकरांना गेल्या तीन दिवसांपासून जाणवू लागले आहे. त्याचप्रमाणे वाऱ्याचे प्रमाणही शहरात कमी झाले असून, एकूणच ‘आक्टोबर हीट’ची चाहूल आतापासूनच जाणवू लागली आहे. भाद्रपद महिन्याचा दुसरा आठवडा संपला असल्याने हळूहळू उन्हाची तीव्रता वाढू लागल्याचे चिन्ह शहरात दिसत आहे. तसेच नऊ वाजेनंतर वातावरणात काही प्रमाणात गारवाही जाणवत असल्याने दुचाकीवरून प्रवास करताना नाशिककरांना थंडी भरत आहे, तर रात्रीचे भोजन आटोपल्यानंतर शतपावलीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना थंड हवेची मंद झुळूक आल्हाददायक वातावरणाची अनुभूती करून देणारी ठरत आहे. एकूणच निसर्गाच्या बदलत्या हवामान चक्रामुळे सध्या नाशिककरांना आगळा वेगळा वातावरण अनुभवयास मिळत आहे. दिवसाच्या बदलत्या प्रहरानुसार वातावरणाची लयदेखील बदलत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. पहाटे धुके , दुपारी ऊन, संध्याकाळी गारवा, रात्री थंडी असे वातावरण सध्या शहरात अनुभवयास येत आहे. (प्रतिनिधी)