ढोलताशा आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवेमय वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी सुरक्षित वातावरणात साध्या पद्धतीने कळवण शहर व तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.
शिवजयंतीनिमित्त कळवण शहरात आमदार नितीन पवार, कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार यांनी गणेशनगर मित्रमंडळ, गांधी चौक मित्रमंडळ, मोरया प्रतिष्ठान, कन्सार भवानी मित्रमंडळ, फुलाबाई चौक मित्रमंडळ, संभाजीनगर मित्रमंडळ, शिवाजीनगर मित्रमंडळ येथील आयोजित शिवजयंती कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कळवण शहरातील भगवती प्रतिष्ठानचा शिवजयंती उत्सव सोहळा लक्ष्यवेधी ठरला. डिजिटल बोर्डच्या माध्यमातून शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत शिवजयंती उत्साहात साजरी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, जयेश पगार, अतुल पगार, प्रशांत पगार, दिलीप पगार, गौरव पगार, रोहित पगार, साहेबराव पगार, देवा शिंदे, दादा निकम, योगेश पगार, संदीप पगार, मोतीराम पगार, मनोज पगार, अनिल निकम, सनी निकम, सुरेश निकम, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
फोटो - १९ गांधी चौक कळवण
गांधी चौक मित्रमंडळ आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यात सहभागी आमदार नितीन पवार, कौतिक पगार, योगेश पगार, सचिन पगार, विनोद पगार, भूषण पगार, राजेंद्र पगार, बापू पगार, मनोज पगार, मोतीराम पगार, कैलास पगार आदी.
===Photopath===
190221\19nsk_41_19022021_13.jpg
===Caption===
फोटो - १९ गांधी चौक कळवण गांधी चौक मित्र मंडळ आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यात सहभागी आमदार नितीन पवार, कौतिक पगार, योगेश पगार, सचिन पगार, विनोद पगार,भूषण पगार, राजेंद्र पगार, बापू पगार,मनोज पगार, मोतीराम पगार,कैलास पगार आदी.