नाशिक : गेल्या शनिवारपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तळेगाव येथील बालिका अत्याचारप्रकरणी रविवारी दिवसभर शहराच्या विविध भागांत निषेध आंदोलने झाली. त्यानंतर शहरातील बहुतांशी शाळा-महाविद्यालयांना सुट्या देण्यात आल्या. मोहरमच्या सुटीनंतर शासकीय कार्यालये गजबजली असली तरी, शाळा-महाविद्यालयांमध्ये उपस्थिती जेमतेम होती. मात्र, आता शिक्षणसंस्था नियमित सुरू झाल्या असून, बाजारपेठांमधील व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. शहर बस वाहतूक सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. (प्रतिनिधी)
शहरातील जनजीवन पूर्वपदावर
By admin | Published: October 15, 2016 2:47 AM