नाशिक : शहराचे तपमान $४० अंशावर गेल्याने नाशिककरांना उन्हाचा चांगलाच चटका बसत आहे. मंगळवारी ३९.२ तपमान नोंदविल्यानंतर बुधवारी त्यात एक अंशाने भर पडल्याने पारा ४०.१ अंशापर्यंत पोहचला. यावर्षी नाशिककरांना मार्च महिन्या-पासूनच कडक उन्हाळा अनुभवयास येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये देखील अधिक उष्णता जाणवत आहे. दोन दिवसांपासून ३९ अंशावर कायम राहिलेल्या कमाल तपमानाचा पारा सरकला आहे. एप्रिलच्या चौथ्याच दिवशी तपमानाने चाळिशी गाठल्याने पुढील नाशिककरांना अधिक प्रखर ऊन जाणवणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. वाढत्या तपमानामुळे उष्म्याही वाढला असल्याने नाशिककर हैराण झाले आहे.
नाशिक शहराचे तपमान ४०.१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 1:27 AM