नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचे थैमान सुरूच असून, गेल्या ७२ तासांत सहा जणांचा बळी गेला आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग हतबल झाला असून, शहराचे आरोग्यच धोक्यात आल्याचे वृत्त आहे. महापालिकेच्या वतीने शहरात स्वाइन फ्लूवर नियंत्रण आणण्यात प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. गेल्या सोमवारी तीन जणांचा मृत्यू एकाच दिवशी झाला होता. एकाच दिवशी २८ स्वाइन फ्लूचे रुग्ण दाखल झाले होते. गेल्या दोन दिवसांत या परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. उलट मंगळवारी (दि.१६) एकाच दिवसात आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर बुधवारी स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण दाखल झाले आहेत. महापालिकेच्या वतीने मात्र दाखल आणि मृत रुग्ण महापालिका हद्दीतील की बाहेरील याची चिकित्सा करीत आकडेवारी देत आहे. चालू वर्षी म्हणजे जानेवारीपासून आत्तापर्यंत महापालिकेच्या वतीने ५७ जणांचा बळी गेला असून, तीनशेहून अधिक रुग्णांना लागण झाली आहे.
नाशिक शहरात स्वाइन फ्लूचे थैमान सुरूच ७२ तासांत सहा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:31 AM