शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

नाशिक  शहरात  वाहन चोरट्यांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:41 PM

शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट वाढला असून, पंचवटी परिसरातून रिक्षा तर इंदिरानगर परिसरातून तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़  अशोकस्तंभ परिसरातील घारपुरे घाट येथील रहिवासी दत्तात्रय जाधव यांची ४५ हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच १५, झेड ६१२४) चोरट्यांनी गुरुवारी (दि़२५) मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरून चोरून नेली. या प्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट वाढला असून, पंचवटी परिसरातून रिक्षा तर इंदिरानगर परिसरातून तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़  अशोकस्तंभ परिसरातील घारपुरे घाट येथील रहिवासी दत्तात्रय जाधव यांची ४५ हजार रुपये किमतीची रिक्षा (एमएच १५, झेड ६१२४) चोरट्यांनी गुरुवारी (दि़२५) मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरून चोरून नेली. या प्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोधलेनगर येथील रहिवासी तरुण मोदियानी यांची ४० हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड दुचाकी (एमएच १५, इडी ३३७२) ५ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी इच्छामणी लॉन्सजवळून चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिरावाडी येथील रहिवासी रतन तरोटे यांची ३० हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिवा (एमएच १५, एफएच २१३१) दुचाकी व राणेनगर पोलीस हौसिंग सोसायटीतील सोनाली हांडगे (रा. राणेनगर पोलीस हौसिंग सोसायटी) यांची ४० हजार रुपये किमतीची अ‍ॅक्सेस (एमएच १५, एफएक्स ३३२४) दुचाकी चोरट्यांनी शनिवारी (दि.२७) सकाळी डब्ल्यूएनएस समोरील पार्किंगमधून चोरून नेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवून लूट इलेक्ट्रिक दुकानदाराला चाकूचा धाक दाखवून दोघा संशयितांनी दुकानातील मायक्रोव्हेव बळजबरीने घेऊन गेल्याची घटना गंजमाळ परिसरातील मास्टर मॉलमध्ये घडली़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित शकील यास अटक केली असून, त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे़ श्याम मोटवाणी (राक़ॉलेजरोड, नाशिक) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित शकील ऊर्फ हंबा शाकीर कुरेशी (३२, रा. खडकाळी) व त्याचा साथीदार जान्या सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मास्टर मॉलमध्ये आले़ त्यानंतर चाकूचा धाक दाखवून शारीरिक तसेच मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी देऊन दुकानातील सुमारे दहा हजार रुपये किमतीचे मायक्रोव्हेव बळजबरीने घेऊन गेले़ या प्रकरणी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा