पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव ग्रामपालिकेच्यावतीने लसीकरणासाठी भीती व गैरसमज दूर करत या कष्टकरी समाजाला लसवंत करण्यासाठी ५ हजार लसीकरणाची मोहीम सुरू केली असून, लवकरच शहर १०० टक्के लसवंत होणार आहे. त्याचा शुभारंभ मंगळवारी सरपंच अलका बनकर यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरातील भाऊनगर, अंबिका नगर येथील कष्टकरी समाज लसीकरणापासून मोठ्या प्रमाणात अजूनही वंचित आहे. त्याचे कारण लसीबाबत गैरसमज. मात्र, गेल्या महिनाभरापासून पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने लसीकरणाबाबत प्रबोधन केले जात असून, त्यासाठी नोंदणीदेखील केली जात होती. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने त्यांना संरक्षित करण्यासाठी ग्रामपंचायतीने वॉर्डनिहाय लसीकरण मोहीम सुरू केली. प्रारंभी भाऊनगर व तीनमधील अंबिका नगर येथील नागरिकांसाठी दोन्ही सत्रांत कोव्हॅक्सिनच्या प्रत्येकी पाचशे लस उपलब्ध केल्या आहेत. पुढील पाच दिवस शहरात प्राथमिक आरोग्य केद्रांव्यतिरिक्त विविध उपनगरांत लसीकरण सत्र राबविले जाणार आहे.
आठवडाभरात पाच हजार नागरिकांना लसीची मात्रा देण्याचे नियोजन असून. अतिरिक्त लसीकरणासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था आणि आरोग्य विभागाला मदत ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपळगाव शहरात काही दिवसात १०० टक्के लसीकरण होणार आहे. यासाठी सरपंच अलका बनकर, उपसरपंच सुहास मोरे, सदस्य गणेश बनकर, आरोग्य सेविका एस. डी. बागुल, नाना तिडके, सारिका बिडवे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी वैभव नलगे, आण्णा खोडे, कस्तुरे आदींसह जिल्हा परिषदेचे शिक्षक मेहनत घेत आहेत.
(१४ पिंपळगाव लसीकरण)
140921\14nsk_20_14092021_13.jpg
१४ पिंपळगाव लसीकरण