नाशिक : शहर व परिसरात रस्त्यांच्याकडेला रहदारीला अडथळा होईल, अशा पद्धतीने बेशिस्तरीत्या वाहने उभी करणाऱ्यांना पुन्हा ‘टोइंग’चा दणका देण्याची तयारी शहर पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आली आहे. यासाठी नव्याने निविदा काढून विविध अटी-शर्थींच्याअधीन राहून ‘नो पार्किंग झोन’मधील दुचाकी, चारचाकी वाहने उचलण्याचा ठेका देण्यात येणार आहे.शहरात यापूर्वीही पोलीस आयुक्तालयाकडून टोइंगची कारवाई करण्यात येत होती. मात्र ठेकेदाराकडून नेमलेल्या वाहनांवरील कामगारांचे असभ्य व उद्धट वर्तन आणि अरेरावीमुळे पोलिसांचीही प्रतिमा मलीन होण्यास सुरुवात झाली. शहरातून टोइंगविरोधात तक्र ारी वाढल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. त्यामुळे अखेर पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये टोइंगची कारवाई थांबविण्यात आली आणि ठेका तत्काळ रद्द केला गेला. जानेवारीअखेर रद्द करण्यात आलेल्या या ठेक्यामुळे नाशिककरांना दिलासा जरी मिळाला त्याचा गैरफायदा घेत वाहतुकीला अडथळा निर्माण होईल यापद्धतीने सर्रासपणे वाहने उभी केली जाऊ लागली. यामुळे पुन्हा शहर वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली. जमावबंदी, संचारबंदी कायद्याचीही पोलिसांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे; मात्र तरीही सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान, शहरातील वर्दळीच्या भागात तसचे प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येते. विविध रस्त्यांच्याकडेला दुतर्फा जागा मिळेत तेथे अगदी बेशिस्तपणे वाहने उभी केली जाऊ लागल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळते.नवीन ठेका तीन महिन्यांचाशहर पोलीस आयुक्तालयाकडून टोइंग व्हॅनसाठी निविदाप्रक्रि या नव्याने राबविली गेली आहे. तीन महिन्यांसाठी ठेका दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी १४ जुलैपर्यंत निविदा मागविल्या गेल्या आहेत. ही प्रक्रि या साधारणत: महिनाभर चालणार आहे, यानंतर प्रत्यक्षात टोइंग व्हॅन रस्त्यांवर दिसतील.
शहर पोलीस पुन्हा राबविणार ‘टोइंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 12:10 AM
शहर व परिसरात रस्त्यांच्याकडेला रहदारीला अडथळा होईल, अशा पद्धतीने बेशिस्तरीत्या वाहने उभी करणाऱ्यांना पुन्हा ‘टोइंग’चा दणका देण्याची तयारी शहर पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आली आहे. यासाठी नव्याने निविदा काढून विविध अटी-शर्थींच्याअधीन राहून ‘नो पार्किंग झोन’मधील दुचाकी, चारचाकी वाहने उचलण्याचा ठेका देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देबेशिस्त पार्किंग : वाहतूक शाखेवर ताण