नाशिक : दहावीच्या परीक्षेत नाशिक शहरातील २० हजार ७५९ (९१.४८ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात १०९६० (९६.३३) मुले तर ९ हजार ७९९ (९८.०२) मुलींचा समावेश आहे. जिल्ह्यातून एकूण ८९ हजार ७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ८४ हजार ५५८ (९४.९३) विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात ९३. ६१ टक्के मुले, तर ९६.४३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.शहरातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातून ९६.८६ टक्केविद्यार्थी उत्तीर्ण झाले. सुरगाणा ९६.७३, कळवण ९६.१५, इगतपुरी ९४.३६ व पेठ तालुक्यात ९२.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी दुर्गम तालुक्यांतील विद्यार्थी निकालात आघाडीवर राहिले आहे.चांदवड ९५.५, दिंडोरी, ९५.१७, देवळा ९५.७४, मालेगाव ९२.२३, मालेगाव शहर ९१.४८, नाशिक ९३, नाशिक शहर ९७.१२, निफाड ९४.४०, नांदगाव ९५.६४, सटाणा ९३.९८,सिन्नर ९५.४६ व येवल्यातील ९४.१८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेआहेत.