नाशिक : शहर व ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाईपदांची भरतीप्रक्रियेस बुधवारी (दि़२२) सकाळपासून सुरुवात झाली़ या भरतीसाठी प्रत्येक दिवशी एक हजार उमेदवारांना बोलावण्यात आहे आहे़ पोलीस भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या मैदानी चाचणीस पहाटे पाच वाजेपासून सुरुवात झाली़ विशेष म्हणजे यावर्षीपासून भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची प्रथम मैदानी चाचणी घेण्यात आली़ यानंतर पात्र ठरणाऱ्यांचीच कागदपत्र तपासणी करण्यात आली़नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात शिपाई पदाच्या रिक्त ७९ व बॅण्ड पथकातील १८ अशा एकूण ९७ जागांसाठी १४ हजार २२० उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. तर नाशिक ग्रामीण पोलीस दलातील शिपाई पदाच्या रिक्त ७२ जागांसाठी ११ हजार २९० उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. शहराची पोलीस भरती ही पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर तर ग्रामीण पोलीस भरतीप्रक्रिया ही आडगावच्या ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू झाली बुधवारी पहाटे पाच वाजेपासूनच मैदानी चाचणीला प्रारंभ झाला़ यामध्ये प्रथम उमेदवारांची उंची, छातीचे मोजणी केल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली़ याबरोबरच गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शहीद अरुण चित्ते पूल ते हॉटेल मिर्चीपर्यंत धावण्याची चाचणी घेण्यात आहे़ यासाठी पहाटे पाच ते दहा व सायंकाळी ४ ते ७ यावेळेत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले़.