नाशिक : शहराच्या कमाल-किमान तपमानाचा पारा मागील तीन दिवसांपासून चढता असून, शहर तापू लागले आहे. शहराचे कमाल तपमान शनिवारी (दि.१०) ३६.२ अंशांपर्यंत तर किमान तपमानाचा पारा १९.२ अंशांपर्यंत स्थिरावल्याने नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका जाणवला. मार्चचा पहिला आठवडा उलटला असून, उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ होत आहे. वातावरणात चांगलाच उष्मा जाणवत आहे. कमाल तपमानाचा पारा मागील गेल्या रविवारपर्यंत ३४ अंशांच्या जवळपास स्थिरावत होता; मात्र सोमवारपासून तपमानाचा पारा ३५ अंशांपर्यंत सरकला. शनिवारी मात्र थेट ३६.२ अंशांपर्यंत कमाल तपमान पोहचल्याने शहर तापल्याचा अनुभव नागरिकांना आला. हवामानातही बदल झाला असून, मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी ३६.२, तर दुसºया दिवशी ३६.३ इतके कमाल तपमान नोंदविले गेले होते. त्यानंतर तपमानात काहीअंशी घट झाली असली तरी वातावरणातील उष्मा कायम टिकून राहिल्याने पुन्हा तपमानाचा पारा दहा दिवसांनी ३६ अंशांपुढे सरकला आहे. तीन दिवसांपासून दररोज संध्याकाळी पाच वाजता शहरात ढगाळ हवामान दाटून येत आहे. स्थानिक हवामानात उष्मा वाढल्यामुळे दुपारनंतर काही प्रमाणात ढग दाटून येत असल्याचे निरीक्षण हवामान केंद्राकडून नोंदविले आले आहे.
शहर तापले! कमाल तपमान ३६.२ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 1:26 AM
नाशिक : शहराच्या कमाल-किमान तपमानाचा पारा मागील तीन दिवसांपासून चढता असून, शहर तापू लागले आहे.
ठळक मुद्देसोमवारपासून तपमानाचा पारा ३५ अंशांपर्यंत दुपारनंतर काही प्रमाणात ढग दाटून