नाशिक : शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीच्या घटना सुरूच आहे. वडाळागाव, सिडको, म्हसरूळ, उपनगर भागात झालेल्या घरफोड्यांमध्ये सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून पोबारा केला.इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वडाळागावातील गोपाळवाडीमध्ये राहणाऱ्या जयवंतबाई ज्योतीसिंग ठाकरे (४०) यांच्या बंद घराचे खिडकीचे गज अज्ञात चोरट्यांनी वाकवून सुमारे ४० हजारांचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, जर्मनचे लहान-मोठे नऊ पातेले, स्टिलच्या ८ पंचपात्री, तांब्याचे हंडे, पाच हजारांचा एलसीडी असा एकूण ४० हजारांचा ऐवज लुटल्याचे ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दुसºया घटनेत अंबड पोलीस ठाणे हद्दीत पवननगर सिडको भागात अज्ञात चोरट्यांनी रिचल वर्गीस (४३) यांच्या घराच्या बाल्कनीचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत बेडरूममधील कपाट फोडले. या कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, तीन हजारांची रोकड, असा ५८ हजारांचा ऐवज चोरी केल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.तिसºया घटनेत उपनगर पोलीस ठाणे हद्दीत आर्टिलरी सेंटररोडवरील जैनभवनाजवळ चोरट्याने बंद घराचा कडीकोयंडा तोडून लॅपटॉप, मोबाइल, पेनड्राइव्ह असा ऐवज लुटल्याची घटना घडली. तसेच चौथ्या घटनेत म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतले पेठरोडवरील वनराज रेसिडेन्सीमधील रहिवासी आशा देवानंद सितान (३७) यांचे बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडून बेडरूममध्ये ठेवलेले सुमारे ८० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरात दोन लाखांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 1:23 AM
शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीच्या घटना सुरूच आहे. वडाळागाव, सिडको, म्हसरूळ, उपनगर भागात झालेल्या घरफोड्यांमध्ये सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून पोबारा केला.
ठळक मुद्देचार घरे फोडली : टोळी सक्रिय; दुचाकी चोरीही सुरूच