नाशिक : अचानकपणे घसरलेला शहराचा पारा आता चढू लागला आहे. शहराचे कमाल तापमान मंगळवारी (दि.१७) थेट ३५.८ अंशांपर्यंत पोहोचले. यामुळे दिवसभर नागरिकांना उन्हाची तीव्रता जाणवली. तापमानात वाढ झाल्याने शहराचे रोगट हवामान सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.शनिवारी (दि.१४) तापमानाचा पारा थेट ११.६ अंशांपर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली होती. मार्च महिन्याचा पंधरवडा उलटला असला तरी शहरात उकाडा जाणवत नव्हता. दोन आठवड्यांपासून शहराचे कमाल तापमान व किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली होती. मागील शनिवारी (दि.७) कमाल तापमान २९.४, तर किमान तापमान १४.८ इतके नोंदविले गेले होते. गेल्या वर्षी मार्च ‘हॉट’ होता. पंधरवड्यापर्यंत ऊन चांगलेच तापलेले होते. १४ मार्च रोजी कमाल तापमानाचा पारा ३१.८ अंशांपर्यंत पोहोचलेला होता. यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाली होती. मार्चअखेरीस २८ तारखेला शहराचे कमाल तापमान थेट ४०.४ अंशांपर्यंत जाऊन पोहोचले होते. मार्चचा पहिला दिवसाचा अपवाद वगळता मागील वर्षी संपूर्ण महिना ‘हॉट’ राहिला होता. यावर्षी मात्र स्थिती पूर्णत: वेगळी असल्याचे अद्याप चित्र दिसत होते; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा लहरी निसर्गाने आपले रूप बदलले असून, कमाल तापमानात वाढ होत असल्याचे हवामान निरीक्षक केंद्राच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. मंगळवारी (दि.१७) शहराचे कमाल तापमान ३५.८, तर क ीमान तापमान १७.४ अंश इतके नोंदविले गेले. मंगळवारी दिवसभर नागरिकांना उन्हाची तीव्रता अनुभवयास आली. यामुळे नाशिककर घामाघूम झाले होते.
शहराचा पारा चढला; कमाल तापमान ३५.८ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 6:44 PM
मागील वर्षी संपूर्ण महिना ‘हॉट’ राहिला होता. यावर्षी मात्र स्थिती पूर्णत: वेगळी असल्याचे अद्याप चित्र दिसत होते; मात्र दोन दिवसांपासून पुन्हा लहरी निसर्गाने आपले रूप बदलले
ठळक मुद्देशहराचे कमाल तापमान ३५.८नाशिककर घामाघूम झाले होतेनागरिकांना जाणवली उन्हाची तीव्रता