शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

नागरिक हवालदिल : पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा

By admin | Published: June 18, 2015 12:27 AM

नांदगावी भीषण पाणीटंचाई

नांदगाव : पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याचा अनुभव नांदगावकर गेल्या दोन वर्षांपासून घेत आहेत. आजही तो अनुभव येत आहे. यात वेगळे काही नसले तरी अलीकडे आवर्तनाचा कालावधी आवर्तनागणिक वाढू लागला आहे. ही नागरिकांच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे पाण्याची समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक इच्छाशक्ती नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.प्रशासन, नगरसेवक, जिल्हा परिषद पाणी विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी यांच्या मे महिन्यात दोन बैठका झाल्या. आवर्तनाचा कालावधी कमी होऊन शहरवासीयांना आठ दिवसांत पाणी मिळणार या वृत्ताने नागरिकांच्या मनात मोर नाचू लागले. पण त्यानंतर परिस्थिती अधिकच ढासळली. १० ते १२ दिवसांनी येणारे पाणी यावेळी चक्क पंधरा दिवसांनी आले.सकाळपासून दुपारपर्यंत एकच चर्चा.. नळ आले, नळ गेले... यातच टाइमपास झाला. जल आगमनापूर्वी येणाऱ्या हवेचा अंदाज नळाच्या तोटीला हात लावून पाहण्यातच नळधारकांचे कित्येक तास वाया गेले. एवढे करूनही पाणी आले तर त्याला दाब नसल्याने कितीतरी भागांमध्ये पाणी लवकर पोहोचले नाही. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर पाणी येऊनही महिलांची अवस्था घट डोईवर.. घट कमरेवर... अशी झाली. मे महिन्यातल्या बैठकांचे सूप वाजले. नगरसेवक, प्रशासन यांचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडे बोट, तर त्यांचा वीज वितरण कंपनीकडे अंगुलीनिर्देश. एकमेकांचे वाभाडे काढण्यात सर्व ‘पार्ट्यां’चे दोन तास गेले. बैठकीत अधिकारवाणीने सांगू शकणारा कोणीच नसल्याने काहीच निष्पन्न झाले नाही. त्याची प्रचिती जूनमध्ये आली. पंधरा दिवस पाणीपुरवठाच झाला नाही. झाला तो अपुराच झाला. बैठकीत समोर आलेली धक्कादायक बाब अशी की, दोन वर्षांपूर्वी तातडीची पूरक योजना म्हणून गाजावाजा करून उद्घाटन केलेली माणिकपुंज धरणाची पाणीपुरवठा योजना त्यातील अंगभूत त्रुटींमुळे नगरपालिकेने मे २०१५ पर्यंत ताब्यात घेतलेली नव्हती.या सर्व गोंधळात शहरवासीयांच्या भावना दर्शविणारे चित्र येथील शनी चौकात काढले आहे. ते बघून थबकणारे नागरिक नगरपरिषदेला दूषणे देत आहेत. (वार्ताहर)