कळवण : तालुक्यातील वडाळे वणी व मोहमुख येथे ग्रामपंचायत अंतर्गत गवंडी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येऊन कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी टी. टी. सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला.प्रशिक्षण शिबिराला कळवण पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी एस. एस. जाधव व ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी आर. एम. सूर्यवंशी यांनी भेट देऊन शौचालय लाभार्थींसोबत चर्चा केली.वडाळे वणी येथे गवंडी प्रशिक्षण कार्यक्र मांचे उद्घाटन सरपंच शिवदास साबळे, उपसरपंच विजय जाधव, तंटामुक्त अध्यक्ष अंबादास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी गट समन्वयक चेतन हिरे, सचिन मुठे, विजय ठाकरे, ज्येष्ठ नागरिक मुरलीधर जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.या प्रशिक्षण वर्गात दोन्ही गावातील प्रत्येकी २०-२० गवंड्यांना शौचालय बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. समारोपप्रसंगी भेट देणाऱ्यात गटविकास अधिकारी टी. टी. सोनवणे गावातील प्रत्यक्ष शौचालयांची पाहणी शौचालयाच्या लाभार्थींसोबत चर्चा केली. त्यांनी लाभार्थी व उपस्थित ग्रामस्थांच्या सभेत शौचालयांचे महत्त्व,आरोग्याला त्याचा होणारा फायदा, स्वच्छ भारत अभियान उपक्र म यांची माहिती दिली. भेटीप्रसंगी विस्तार अधिकारी आर. एम. सूर्यवंशी, वडाळे वणी सरपंच, उपसरपंच आनंद चौधरी, ग्रामसेवक हेमलता पगार, रोशन परदेशी, मोहमुखचे ग्रामसेवक सुनील बस्ते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या आदेशान्वये तालुक्यातील सर्व प्रस्तावित गावांना संपर्कअधिकारी नेमण्यात आले असून प्रत्येक गावाच्या ग्रामसेवकाला त्या गावाजवळ असलेले चार ते पाच गावांचे ग्रामसेवक सहायक, ग्रामसेवक मदतीस देण्यात आले असून कळवण तालुका ग्रामसेवक संघटना स्वच्छ भारत अभियानात सक्रि य सहभाग घेत असल्याची प्रतिक्रि या गटविकास अधिकारी टी. टी. सोनवणे यांनी दिली.(वार्ताहर)
गवंडी प्रशिक्षण शिबिराचा समारोप
By admin | Published: December 27, 2015 11:23 PM