नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार शनिवारी (दि.१३) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हाभरात १४ हजार ७५७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये १२ हजार ४२७ दावे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली.राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हास्तरावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. वाद संपविण्याकरिता लोकअदालतीचा उपयोग करून घ्यावा, कारण लोकअदालीतमध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांना अपील नसते आणि वाद संपुष्टात येतो. त्यामुळे अधिकाधिक पक्षकारांनी लोकअदालतीचा फायद्या घ्यावा, असे आवाहन जोशी यांनी केले होते. लोकन्यायालयाच्या न्यायाने दोन्ही पक्षांना समाधान मिळाल्याचे यावेळी दिसून आले.जिल्हाभरातून प्रलंबित प्रकरणांपैकी १३ हजार ५४५ प्रकरणे अदालतीपुढे ठेवण्यात आली होती. तसेच दावापूर्व दाखल प्रकरणे १ लाख ६ हजार ७७५ होती. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी धनादेश न वटल्याने ८६८, फौजदारीची ८१८, बँकेची ६४, मोटार अपघात व नुकसानभरपाईची २०५, कामगारांची २, कौटुंबिक वादाची १३३, भूसंपादनाशी संबंधित ५, दिवाणी दावे २२७ व इतर २ अशा एकूण २ हजार ३३० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. राष्टÑीय लोकअदालतीसाठी प्राधिकरणचे सचिव प्रसाद पी. कुलकर्णी यांच्या नियंत्रणाखाली कामकाज पार पडले.
लोकन्यायालयात साडेचौदा हजार प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 1:05 AM
राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार शनिवारी (दि.१३) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हाभरात १४ हजार ७५७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये १२ हजार ४२७ दावे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली.
ठळक मुद्दे१३ हजार प्रलंबित प्रकरणे ; नागरिकांकडून न्यायनिवाड्याने समाधान