शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!
2
Video: विनोद कांबळीला पाहताच सचिन तेंडुलकर भेटायला गेला, त्याला पाहून 'बालमित्र' भावूक झाला...
3
अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघे ताब्यात
4
शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटख्या जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई
5
अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई
6
अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द
7
संभल हिंसाचाराचं पाकिस्तान कनेक्शन! 3 पुरावे ओरडून-ओरडून देतायत साक्ष; फॉरेन्सिक टीमनं नाल्या खंगाळल्या
8
“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे
9
UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती?
10
वाह.. क्या बात है! विराट-रोहितची एकत्रित नेट प्रक्टिस पाहायला ऑस्ट्रेलियन फॅन्सची गर्दी (Video)
11
निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला...
12
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर; नेमकी कोणती चर्चा झाली?
13
7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?
14
“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका
15
"आपणच सर्व उत्तरं द्या...!"; मोदी सरकारमधील मंत्र्यांवर का नाराज झाले ओम बिरला? भरसंसदेत म्हणाले...
16
Pappu Yadav : मोठा खुलासा! पप्पू यादव यांना सुरक्षा मिळावी म्हणून जवळच्यांनी रचला 'धमकीचा ड्रामा'
17
Airtel आणि Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन; मिळेल फास्ट इंटरनेट
18
निर्मला सीतारामन जिथे 'निरीक्षक' म्हणून गेल्या, तिथे कसा होता भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला?
19
“मोदी-शाह, १० हजार लाडक्या बहिणी, २ हजार शेतकरी शपथविधीला येणार”; भाजपा नेत्याने यादीच वाचली
20
"आम्ही कधीही लग्न करणार नाही’’, १२ तरुणींनी घेतला अजब निर्णय, कारण काय? 

बिबट्याच्या हल्ल्यात नागरिक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 10:29 PM

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील देवळीचा पाडा येथील नागरिकावर वनारे शिवारात बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात सदर नागरिक जखमी झाला असून भर दुपारी बिबट्याचा हल्ला झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशेवरे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि उजव्या हातावर गंभीर दुखापत झाली आहे.

ननाशी : दिंडोरी तालुक्यातील देवळीचा पाडा येथील नागरिकावर वनारे शिवारात बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात सदर नागरिक जखमी झाला असून भर दुपारी बिबट्याचा हल्ला झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळीचा पाडा येथील दत्तू गंगाराम शेवरे (६०) हे शेताला कुंपण करण्यासाठी वनारे शिवारातील जंगलात काटेरी वनस्पती आणण्यासाठी एका सहकाऱ्यासोबत दुपारी तीनच्या सुमारास गेले होते. काटेरी वनस्पती तोडत असतांना एका दाट झाडीतून अचानक बिबट्याने दत्तू शेवरे यांच्यावर हल्ला चढविला आणि पंजाने त्यांच्यावर हल्ला केला त्यात शेवरे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि उजव्या हातावर गंभीर दुखापत झाली आहे.अचानक झालेल्या हल्ल्याने शेवरे प्रचंड घाबरून गेले पण त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्याने आरडाओरड करीत आजूबाजूचे नागरिक गोळा केले आणि बिबट्याला पळवून लावले. दरम्यान जखमी झालेल्या दत्तू शेवरे यांना तातडीने ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दरम्यान सध्या पावसाचे दिवस असल्याने परिसरात शेतांचे मोकाट गुरांपासून संरक्षण करण्यासाठी काटेरी वनस्पतींचे कुंपण केले जाते. त्यासाठी काटेरी वनस्पती आणण्यासाठी शेतकरी आणि नागरिक जंगल परिसरात जात असतात. ऐन दुपारी बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभागleopardबिबट्या