नाशिक : शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात ज्युनिअर क्लार्क आॅनलाइन परीक्षेत डमी विद्यार्थी म्हणून बसलेल्या औरंगाबाद येथील तोतया परिक्षार्थीला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसरूळ येथिल रिलायन्स पेट्रोलपंपा जवळ बॉक्स अँड बुक्स स्कूल असून या शाळेत शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात ज्युनिअर क्लार्कपदासाठी आॅनलाईन परीक्षा घेतली जाते होती. त्या परीक्षेला औरंगाबाद येथील प्रदीप भद्रसेन बहुरे हा परीक्षा उत्तीर्ण व्हावा म्हणून त्याच्या जागी प्रीतमसिंग हरिचंद गोगावाल परीक्षासाठी हॉल तिकीट व पॅन कार्ड घेऊन परीक्षा गृहात आलेला होता त्यावेळी कामठवाडे येथिल परीक्षक म्हणून असलेले अतिश अभिमन शेवाळे यांनी हॉल तिकीट तपासणी केल्यावर त्यांना संशय आला त्यावेळी त्याची चौकशी केली असता तो तोतयागिरी करत असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी गोगवाल याला अटक केली असून त्याचा साथीदार बहुरे याचा शोध पोलिस घेत आहेत. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील तपास करत आहे.
क्लार्क परिक्षेतील बनावट विद्यार्थ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 1:40 PM
शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात ज्युनिअर क्लार्क आॅनलाइन परीक्षेत डमी विद्यार्थी म्हणून बसलेल्या औरंगाबाद येथील तोतया परिक्षार्थीला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे
ठळक मुद्देज्युनिअर क्लार्क आॅनलाइन परीक्षऔरंगाबाद येथील तोतया परिक्षार्थीम्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे.