शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

संघर्ष समितीच्या तोंडाला पुसली पाने, ठेकेदार आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 12:21 AM

जिल्हा परिषदेच्या मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंते तसेच नोंदणीकृत ठेकेदारांचे कोट्यवधी रुपयांचे धनादेश वटत नसल्याप्रकरणी गुरुवारी (दि.५) जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची भेट घेतली.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंते तसेच नोंदणीकृत ठेकेदारांचे कोट्यवधी रुपयांचे धनादेश वटत नसल्याप्रकरणी गुरुवारी (दि.५) जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची भेट घेतली. अन्य योजनेतून निधी देऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी दीपककुमार मीणा यांनी दिले. तसेच यासंदर्भात शुक्रवारी (दि.६) एक तातडीची बैठक जिल्हा बॅँक अध्यक्ष व कार्यकारी संचालकांची घेणार असल्याचे सांगितले.गुरुवारी जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची भेट घेऊन ठेकेदारांचे अडकलेले ३५ कोटी रुपये कधी भेटणार, यासंदर्भात चर्चा केली. मागे आंदोलनाच्या वेळी पाच सप्टेंबरपर्यंत यातील निम्मी रक्कम देण्याचे आश्वासन लेखा विभाग व जिल्हा बॅँकेने दिले होते, असे या संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी सांगितले. त्यावर दीपककुमार मीणा यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांना सांगितले की, तुम्ही प्रत्येक वेळी आपल्यालाच लक्ष का करतात, याबाबत पदाधिकाºयांना का भेटत नाहीत, दुसºया निधीतून पैसे दिले तर माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे याप्रकरणी जिल्हा बॅँक अध्यक्ष व कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांना शुक्रवारी भेटून निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी, मजूर संघाचे संचालक शशिकांत आव्हाड, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे निसर्गराज सोनवणे, अजित सकाळे, अनिल चौघुले, चंद्रशेखर डांगे, संजय कडनोर आदी उपस्थित होते.