सटाणा : बागलाण तालुक्यातील नामपूर येथे प्रार्थनास्थळ बांधण्यावरून एका समाजाच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. दंगलखोरांनी दोन घरांसह बेकरीची तोडफोड केली . या दंगलीत सात जण जखमी असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही दंगल काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास नामपूर येथील जोशी हॉस्पिटल पाठीमागे घडली .याप्रकरणी पोलिसांनी चाळीस ते पन्नास दंगलखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.नामपूर येथे मुस्लीम समाजाच्या एका जमातीने काही दिवसांपूर्वी स्वतंत्र प्रार्थनास्थळ बांधले होते. यामुळे गावातील दोन जमातीमध्ये गेल्या काहीदिवासंपासून धुसफूस सुरु होती. काल रात्रीच्या सुमारास भडका उडून प्रार्थनास्थळ का बांधले याची कुरापत काढुन दोन गट लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांवर चालून आले. यामुळे तुफान हाणामारी होऊन दंगल उसळली .दंगलखोरांनी दुर्गामाता चौकातील सादिक शेख यांच्या घरावर हल्ला चढवून त्यांना बेदम मारहाण करून घराची मोठ्याप्रमाणात तोडफोड केली. त्यानंतर या दंगलखोरांनी आपला मोर्चा मोसम बेकरीकडे वळवून बेकरीची तोडफोड केली त्यानंतर बेकरी मालक नजमुल हुसेन युसुफ आली शेख यांच्या घरावर हल्ला केला. नजमुल हुसेन युसुफ अली शेख रा. नामपुर यांच्या फिर्यादीनुसार अन्सार उस्मान पठाण, सादिक नुर शेख, दाउद मुसा शहा, इकबाल मुसा शहा, निसार बाबु शहा, रज्जाक इरफान शहा, मुस्तपिन सुलतान शहा, राजू इमाम शहा, दिलनवज सलीम शहा, लियाकत शब्बीर शेख, छोटू उर्फ अन्सार शाम शेख. सर्व राहनार नामपुर यांच्यासह चाळीस ते पन्नास दगलखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख सादिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादिवरून सादीक शकील शहा, मुस्तपिन बाबु शहा, वसीम फकरूद्दीन सैय्यद, अकबर निमाम शहा, युनुस निमाम शहा, आशीक निमाम शहा, सिराफ उस्मान शहा, फिरोज लुकमान शहा, छोटु शेख रज्जाक,रईस बाबु शहा, आदिल अस्पाक शहा, लुकमान शेख गणी, शेख तनमुल हसन यांच्यासह १० ते १५ जनांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मालेगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अशोक नखाते करीत आहेत आहेत.(वार्ताहर)
नामपूर येथे दोन गटात हाणामारी
By admin | Published: August 04, 2015 11:00 PM