चौकट-
धुळे जिल्ह्यात स्थानिक परवानगी नाही
नाशिक विभागात १७४ पैकी १६१ शासकीय आणि १८२ पैकी १६२ अनुदानित आश्रमशाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शासकीय शाळांमध्ये ७१६५, तर अनुदानित शाळांमध्ये ७२५६ विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. धुळे जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने परवानगी न दिल्याने तेथील शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत.
चौकट-
अद्याप कार्यपुस्तिकांची छपाई नाही
आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करतानाच पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागाने शिक्षण सेतू प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांच्या गावात जाऊन माेकळ्या जागेत शाळा भरवून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना जुनी पुस्तके देण्यात आली आहेत; मात्र विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कार्यपुस्तिकांची अद्याप छपाईच झाली नसल्याने त्याची अद्याप विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.