नाशिक : बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतर शनिवारी (दि.२५) नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. विभागीय मंडळाच्या कार्यालयात या गुणपत्रिकांचे महाविद्यालयनिहाय वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील दोन दिवसात वर्गीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यमंडळाच्या सुचनांनुसार संबिधत महाविद्यालयांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरीता करण्याच्या सुचना विभागीय मंडळाकजून करण्यात येणार आहेत.बारावीच्या गुणपत्रिका कधी मिळणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये असेलली संभ्रमावस्था आता संपुष्टात आली असून येत्या आठवड्याच्या पूर्वार्धातच विद्यार्थ्यांच्या हातात गुणपत्रिका मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी विभागीय मंडळाच्या कार्यालयात कार्यवाही सुरू आहे. नाशिक विभागातून ८९ हजार २५ मुले व ६७ हजार ६६४ मुले असे एकूण १ लाख ५६ हजार ७८९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षे प्रविष्ट झाले होते. त्यौपकी असे एकूण १ लाख ३९ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, नाशिक जिल्ह्यातील ७० हजार १२९ विद्यार्थ्यांपैकी ६२ हजार ७३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ५९ कनिष्ठ महाविद्यालयांमधील १० हजार २७ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. संपूर्ण विभागातील नाशिक, धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये तथा उच्च माध्यमिक विद्यालयांना गुणपत्रिकाचे गठ्ठे तयार करण्याचे काम विभागीय कार्यालयात सुरू आहे. राज्य मंडळाकडून प्राप्त झालेल्या गुणपत्रिकांची पडताळणी करून त्यां संबधित महाविद्यालयांची स्वतंत्र पाकिटे तयार करून त्यात भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही पाकिटे महाविद्यालयांना सुपुर्द करण्यात येणार आहे, त्यानंतर महाविद्यालयस्तरावर विद्यार्थ्यांना टप्प्याटप्याने गुणपत्रिकांचे वाटप करण्याच्या सुचना करण्यात येणार असून गुणपत्रिकांचे वितरण करताना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय मंडळाचे सचीव नितीन उपासणी यांनी दिली आहे.
बारावीच्या गुणपत्रिकांचे वर्गीकरण सुरू ; दोन दिवसात महाविद्यालयांना वाटपाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 4:18 PM
बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतर शनिवारी (दि.२५) नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. विभागीय मंडळाच्या कार्यालयात या गुणपत्रिकांचे महाविद्यालयनिहाय वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील दोन दिवसात वर्गीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यमंडळाच्या सुचनांनुसार संबिधत महाविद्यालयांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देनाशिक विभागाला मिळाल्या बारावीच्या गुणपत्रिका विभागीय कार्यालयात गुणपत्रिकांचे वर्गीकरण सुरू