शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकची डॉक्युमेंटेशनमध्ये २२ व्या क्रमांकावर झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 7:01 PM

आयुक्तांनी दिली माहिती : ४ जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण

ठळक मुद्देयंदा देशभरातील ४१४० शहरांसाठी स्वच्छता सर्वेक्षणखतप्रकल्प, घंटागाडी, वेस्ट टू एनर्जी, घनकचरा व्यवस्थापन यामध्ये केलेल्या कामगिरीची दखल

नाशिक - केंद्र सरकारमार्फत घेण्यात येणा-या स्वच्छ सर्वेक्षणात अमृत योजनेतील पाचशे शहरांमध्ये नाशिकने आतापर्यंत कागदपत्रांच्या आधारे २२ व्या क्रमांकावर झेप घेतली असून येत्या ४ जानेवारी पासून प्रत्यक्षपणे सुरू होणा-या स्वच्छ सर्वेक्षणात यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करण्याचा निर्धार महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.स्वच्छता सर्व्हेक्षणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिकच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी सांगितले, यंदा देशभरातील ४१४० शहरांसाठी स्वच्छता सर्वेक्षण होत आहे. जी शहरे अमृत योजनेत समाविष्ट आहे, त्यांची वेगळी स्पर्धा होत आहे. नाशिक महापालिकेने आतापर्यंत जी कागदपत्रे सादर केली आहेत, त्या आधारे १८०० गुणांमध्ये १६४१ गुण संपादन करत २२ व्या क्रमांकावर झेप घेतलेली आहे. महापालिकेने वर्षभरात खतप्रकल्प, घंटागाडी, वेस्ट टू एनर्जी, घनकचरा व्यवस्थापन यामध्ये केलेल्या कामगिरीची दखल त्यात घेण्यात आलेली आहे. याशिवाय, महापालिकेने तयार केलेल्या स्वच्छता अ‍ॅपलाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. येत्या ४ जानेवारी पासून शहरात प्रत्यक्ष स्वच्छता सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे. त्यासाठी केंद्रीय पथकही येणार आहे. यंदा महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणाच्या दृष्टीने समाधानकारक कामे केली असून त्यामुळे प्रत्यक्ष सर्वेक्षणात आणखी कामगिरी उंचावण्याची अपेक्षाही आयुक्तांनी व्यक्त केली.बक्षिसांची घोषणामुख्यमंत्र्यांनी स्वच्छता सर्वेक्षणात पहिल्या दहा शहरांमध्ये येणा-या शहरांना २० कोटी रुपये, १० ते २० शहरांच्या यादीत येणाºया शहरांना १० कोटी तर आदर्श प्रभागासाठी २० लाख रुपये बक्षिस देण्याची घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेतले असल्याने पहिल्या दहा शहरांच्या यादीत नाशिकचा क्रमांक यावा यासाठी प्रशासनाबरोबरच सत्ताधारी भाजपाचीही कसोटी लागणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका