शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत दिंडोरी नगरपंचायतीच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांनी पृथ्वी, अग्नी, जल, वायू व आकाश या पाच तत्त्वांच्या समतोल व संवर्धनासाठी भाग घ्यावा यासाठी शुक्रवारी (दि. २२) सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता मोहीम घेण्यात आली. सदर सफाई मोहिमेच्या प्रारंभी उपस्थितांना हरित कायदा पालनाची शपथ देण्यात आली. शहरातील पालखेड रोड जिल्हा परिषद शाळा व सार्वजनिक वाचनालय येथे सफाई करण्यात आली. या मोहिमेस दिंडोरी नगरपंचायतीच्या अध्यक्ष रचना जाधव, उपाध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, नगरसेवक, कार्यालय अधीक्षक प्रशांत पोतदार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर मोहिमेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. यावेळी मुख्याधिकारी यांनी दि. २८ रोजी काढण्यात येणाऱ्या सायकल रॅलीत नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
===Photopath===
220121\22nsk_29_22012021_13.jpg
===Caption===
दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने हरित कायदा पालनाची शपथ अधिकारी व कर्मचारी.