शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

नाशकात सफाई कामगारांना आता नालेसफाईचेही काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 6:51 PM

महापालिका : पावसाळ्यात आरोग्य विभागाकडे जबाबदारी

ठळक मुद्देमहिनाभरापासून महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत शहरात पावसाळापूर्व नालेसफाईचे काम जोमात सुरू पावसाळ्यात नाले तुंबण्याची परिस्थिती उद्भवणार नसल्याचा दावा

नाशिक - गेल्या महिनाभरापासून महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत शहरात पावसाळापूर्व नालेसफाईचे काम जोमात सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मात्र, नालेसफाईची जबाबदारी आरोग्य विभागाकडे सोपविण्यात येणार असून रस्त्यांबरोबरच नालेसफाईचेही काम सफाई कामगारांकडून करुन घेतले जाणार आहे. त्यामुळे, पावसाळ्यात नाले तुंबण्याची परिस्थिती उद्भवणार नसल्याचा दावा महापालिकेच्या सूत्रांनी केला आहे.महापालिकेमार्फत दरवर्षी पावसाळापूर्व नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. आजवर ही कामे पावसाळा तोंडावर असताना मे-जून मध्ये केली जायची. परंतु, यंदा १ एप्रिल पासूनच शहरातील तुंबलेल्या नाल्यांची सफाई करण्याचे काम महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत घेण्यात आले आहे. बांधकाम विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. त्या-त्या एजन्सीची यंत्रणा वापरून महापालिकेमार्फत नालेसफाई केली जात आहे. ज्याठिकाणी पावसाळ्यात नाले तुंबण्याची स्थिती उद्भवते, त्याठिकाणी सफाईकामाकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. जेसीबीच्या माध्यमातून थेट नाल्यांमध्ये उतरून घाण-कचरा तसेच वाढलेले गवत हटविण्याचे काम सुरू आहे. बांधकाम विभागामार्फत जून पर्यंत सदर नालेसफाईची कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यानंतर, नालेसफाईची जबाबदारी आरोग्य विभागाकडे सोपविली जाणार आहे. पावसाळ्यात रस्ते सफाईचे काम कमी होते. त्या काळात रस्त्यांवर जास्त घाण-कचरा राहत नाही. अशावेळी आरोग्य विभागाकडील सफाई कामगारांमार्फत नालेसफाईची कामे करुन घेतली जाणार आहेत. बऱ्याचदा रस्ते झाडताना सफाई कामगारांकडूनच रस्त्यालगतच्या नाल्यांमध्ये कचरा टाकून दिला जातो. परंतु, रस्त्यांबरोबरच नाले सफाईचीही जबाबदारी सफाई कामगारांवर टाकल्यास त्यांच्याकडून कचरा टाकला जाणार नाही. नाल्यांमध्ये घाण-कचरा टाकणा-या नागरिकांकडून दंड वसुलीचीही जबाबदारी आरोग्य विभागाकडे सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका