देवळा : शहरात शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९-२० कार्यक्र मांतर्गत देवळा नगरपंचायतीच्या प्रांगणात येथील जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी जनजागृती पर पथनाट्य सादर केले.देवळा नगरपंचायत प्रशासनाने मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्र मांतर्गत जनजागृती, प्लास्टीक जप्ती, दंडात्मक कारवाई आदी उपक्र मातून शहर स्वच्छतेची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुसंगाने येथील जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी गावातून फेरी काढून स्वच्छतेसंबंधी फलकांद्वारे जनजागृती केली. यानंतर नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात पथनाटय सादर केले. या पथनाटयाव्दारे देवळा शहरातील जनतेला स्वच्छतेचा संदेश देण्यात आला, तसेच स्वच्छतेची शपथ देण्यात आली. नगरपंचायतीच्या वतीने पथनाटयात सहभाग घेतलेल्या विद्यार्थीनींना प्रशस्तीपत्र देण्यात येवून त्यांना सन्मानित करण्यात आले.चौकट....शाळेचे आवार तसेच सार्वजनिक ठिकाणी येणारा ओला कचरा, यामध्ये चॉकलेट, कॅडबरी, शाम्पू, छोटया मसालाच्या पुडया इत्यादी छोटया पॅकेजिंग करीता वापरण्यात आलेले आवेस्टने जमा करण्यात आलेल्या विद्यार्थीनींना नगरपंचायत मार्फत कॅडबरी चॉकलेट वाटप करण्यात आले. तसेच यापुढे जो विद्यार्थी नगरपंचायमध्ये जास्तीत जास्त आवेस्टने जमा करेल अशा विद्यार्थ्याला दहा नगासाठी एक कॅडबरी बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली.जो विद्यार्थी एका महिन्यात जास्त प्लॅस्टिक जमा करेल त्यास वेगळे बक्षीस देण्यात येउन सन्मानित करण्यात येणार आहे. सदर प्लॅस्टिक आवेस्टने नगरपंचायत कार्यालयात कार्यालयीन वेळेत स्वच्छता अभियान शहर समन्वय यांचे कक्षात स्विकारण्यात येईल अशी माहिती नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आली.याप्रसंगी मुख्याधिकारी संदिप भोळे व विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले. उपनगराध्यक्ष अतुल पवार, संजय अहेर, नगरसेवक बाळासाहेब अहेर, केदा वाघ, प्रदिप अहेर, सुनिल भामरे, अनिल अहेर, पल्लवी भामरे, अलका सूर्यवंशी, बापू बोरसे, जे. टी. बत्तीसे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पथनाट्याद्वारे देवळा शहरात स्वच्छता जनजागृती कार्यक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 9:58 PM
देवळा : शहरात शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९-२० कार्यक्र मांतर्गत देवळा नगरपंचायतीच्या प्रांगणात येथील जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी जनजागृती पर पथनाट्य सादर केले.
ठळक मुद्देपथनाटयात सहभाग घेतलेल्या विद्यार्थीनींना प्रशस्तीपत्र देण्यात येवून त्यांना सन्मानित करण्यात आले. चौकट....