बालसंस्कार केंद्राच्या ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सोनेवाडी गावाजवळील सोनगड किल्ल्यावर स्वच्छता केली. सोनगडावर दोरखंडाचा जीना करून मराठा सैन्याने हल्ला केल्याचा उल्लेख आहे. या किल्ल्यावर खंडोबाचे मंदिर आहे. पायथ्याशी दुर्गा तर डावीकडे हनुमान मंदिर आहे. झेनिया, विंचवी, कुसूम, आभाळी, छोटा कल्प, अमरी आदी वनफुलांनी हा किल्ला बहरतो. दाट जंगलात जैवविविधतेने नटलेल्या या किल्ल्यावर अनेक प्रकारची औषधी वनस्पतीदेखील आहेत. किल्ल्यावर दोन खांबी गुहा, पाण्याची टाके आहे. वनविभाग व पुरातत्व खात्याने या गडाकडे लक्ष देऊन सोनगडाचा सर्वांगीण विकास करून इतिहास जतन करावा असे मत जयराम शिंदे यांनी व्यक्त केले. स्वच्छता अभियानात जयराम शिंदे, रामदास शिरसाठ, रोहित वालझाडे, अथर्व शिरसाठ, करण भागवत, समर्थ कर्डिल, दर्शन वाघ, यश भालेराव, सोहम बागुल, पूजा कर्डीले, वैष्णवी आमले, अनुष्का काकड, चैताली टापसे, ऋतुजा डगळे, गायत्री डगळे, आराध्या शिंदे आदींनी सहभाग घेतला.
ठाणगावच्या स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्राच्यावतीने स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 5:34 PM