शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सोमवारी स्वच्छता अभियान मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:26 AM

जनजागृती : दर तीन महिन्यांनी राबविणार अभियान नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांमध्ये वैयक्तिक व सामूहिक स्वच्छतेविषयी जागृती करण्यासाठी सोमवार, दि. १८ रोजी नाशिक शहर व काही नगरपालिकांच्या हद्दीत एकाच वेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी दिली.

जनजागृती : दर तीन महिन्यांनी राबविणार अभियान

नाशिक : शहर व जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांमध्ये वैयक्तिक व सामूहिक स्वच्छतेविषयी जागृती करण्यासाठी सोमवार, दि. १८ रोजी नाशिक शहर व काही नगरपालिकांच्या हद्दीत एकाच वेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी दिली.जिल्हाधिकाºयांनी आज या संदर्भात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या अधिकाºयांची बैठक घेतली व त्यांची याबाबतची मते जाणून घेतली. या मोहिमेंतर्गत प्रामुख्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेला प्राधान्य देण्यात येणार आहे.या मोहिमेत जिल्हा परिषद, महापालिका कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटना, ज्येष्ठ नागरिक, एनसीसी, गृहरक्षक दल व सामान्य व्यक्तींनाही सामावून घेण्यात येणार आहे. त्यासाठी ठिकाणे निश्चित करण्याचे काम केले जात असून, स्वच्छतेसाठी लागणारी सामग्री महापालिका पुरविणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. सदरची मोहीम एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता दर तीन महिन्यांनी अशाप्रकारे अभियान राबवून स्वच्छतेबाबत जागृतीला हातभार लावण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. या मोहिमेंतर्गत गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दाही हाती घेण्यात येणार असून, ज्या ज्या ठिकाणी गोदावरीत सांडपाणी मिसळले जाते अशी ठिकाणे निश्चित करून त्यावर कार्यवाहीसाठी महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. गेल्या वर्षी केवळ ४, तर यंदा ६९ बळीनाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत स्वाइन फ्लू रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी स्वाइन फ्लूचे फक्त चार मृत्यू झाले होते. यंदा ६९ मृत पावले आहेत. आजवर ३२८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. मृतांमध्ये नाशिक महापालिका हद्दीत २४ असून, २० ग्रामीण भागात तर अन्य पर जिल्ह्यातील रुग्ण आहेत. येणाºया काळात स्वाइन फ्लूसाठी पोषक वातावरण असणार असल्याने जनजागृती केली जाणार आहे.