केंद्रातील मुलांनी रविवारी सकाळी दहा वाजता गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या तोफेपासून स्वच्छता मोहीमेस प्रांरभ करण्यात आला. पहिल्या गुहेतील लक्ष्मणस्वामी महाराज यांच्या समाधी स्थळाची व गडावरील गडदेवता आंबा, निंबा व पट्टाई देवी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर अंबारखाण्याजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेल्या परिसराची साफ सफाई करण्यात आली. त्यानतंर संकलित केलेला प्लास्टिकच्या बाटल्या, कागदी पिशव्या आदींसह गोळा केलेल्या कच-याची विल्हेवाट लावण्यात आली. मंदिराच्या बाजूला असणाºया पुरातन टाक्याही यावेळी स्वच्छ करण्यात आल्या. पट्टाई देवीची आरती करून अंबारखाण्यातील शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे पूजन या बाळगोपाळांनी केले. यावेळी केंद्राच्या वतीने जयराम शिंदे यांनी श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रातील सर्व मुलांना या विश्रामगडावरील शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याची माहिती सांगितली. गडावरील स्वच्छता मोहीमेत सहभागी झालेल्या या मुलांनी साफ-सफाईसाठी लागणारी झाडू पावडे आप-आपल्या घरूनच आणले होते. स्वच्छता मोहीमेत सार्थक काकड, सुदर्शन आंबले, सिद्धांत साकोरे, सिद्धी शिंदे, कावेरी भोर, प्रणाली बो-हाडे, अनुष्का काकड, दिव्या शिंदे, चैताली टापसे, संस्कृती व्यवहारे, वैष्णवी आमले आदींसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शिवजयंतीच्या पाशर््वभूमीवर या बाल- गोपाळांनी केलेली ही स्वच्छता मोहीम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली.मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जयराम शिंदे, जगदीश शिरसाठ, ऋतुराज आंबेकÞर, ओमकार बोराडे, साईराज कार्डिले आदीनी प्रयत्न केले.
विश्रामगडावर बालकांनी राबविली स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 5:38 PM