नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने शनिवारी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबवली. आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्याबरोेबरच सामाजिक उपक्रम म्हणून विविध उपक्रम राबविणाºया सायक्लिस्टच्या वतीने कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नेहमीच समाजाचे भान ठेवत सामाजिक उपक्रम राबविणाºया नाशिक सायकलिस्टच्या या उपक्र मात दहा लहान मुलांसह सुमारे १५० सभासद सहभागी झाले होते. यावेळी कळसूबाई शिखर चढाईच्या संपूर्ण मार्गावर पर्यावरण व स्वच्छतेचे संदेश देणाºया १५ कचराकुंड्या लावण्यात आल्या. त्यावर विशेष असे संदेश असलेले फलक लावण्यात आले आहेत. यावेळी स्वच्छतेबाबत सर्वांनी शपथ घेतली. परिसर स्वच्छ राहावा, यासाठी वारंवार विविध ठिकाणी अशा मोहिमा राबविण्यात येणार आहेत. नाशिक सायकलिस्टचे मार्गदर्शक आयपीएस अधिकारी हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात आली. नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, शैलेश राजहंस आणि डॉ. मनीषा रौंदळ यांनी संपूर्ण मोहिमेचे अचूक नियोजन केले. योगेश शिंदे आणि त्यांच्या टीमने चढाई मार्गावर फलक लावण्यासाठी मेहनत घेतली. फलक लावण्यासाठी स्वामी समर्थ माध्यमिक व महाविद्यालय राजूर (अकोले) यांच्या हिवाळी शिबिरानिमित्त आलेले विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक भोर यांनी विशेष परिश्रम घेतले. ट्रेकर सुरेंद्र शेळके यांनी २३ तारखेला रात्री शिखरावर मुक्काम करत सायकलिस्ट्स सदस्यांकडून राहिलेला कचरा गोळा करत पुण्याला रवाना झाले. हरीश बैजल सहकुटुंब या मोहिमेत सहभागी झाले होते. जळगावचे अनिल सोनवणे हे रात्रभर प्रवास करत या खास मोहिमेत सहभागी झाले. शिखरावरील मंदिराजवळ त्यांच्या चाळीस लोकांच्या टीमने साफसफाई केली. राजूरचे शांताराम काळे यांनी गावातील पंधरा मुलांना या मोहिमेत सहभागी करून घेतले. एस्पालिअर शाळेचे सचिन जोशी यांनी बसेस उपलब्ध करून दिल्या. गोळा केलेला कचरा पुनर्वापरासाठी पाठविला शनिवारी सकाळी ५ वाजता गोल्फ क्लब मैदान येथून १५० जणांच्या टीमने कळसूबाई शिखराकडे प्रस्थान केले. शिखरावर पोहचल्यानंतर सर्वांनी मिळून एकूण ५० गोणी कचरा गोळा केला. गोळा केलेला कचरा एका ट्रकमध्ये भरून तो पुनर्वापर करण्यासाठी नाशिकला पाठविण्यात आला.
कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:15 AM