त्र्यंबकेश्वर : राष्टÑपिता महात्मा गांधी जयंती व स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतर्फे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयात स्वच्छ सर्वेक्षणाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील विविध प्रभाग, तलाव, पार्किंग परिसर, मुख्य रस्ते आदी ठिकाणी नागरिकांच्या, सेवाभावी संस्था, महिला बचतगट व शालेय विद्यार्थी आदींच्या श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, समीर पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभातफेरीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ व २, नूतन त्र्यंबक विद्यालय, एमआरपीएच कन्या विद्यालय नाशिक सेवा समिती आश्रमशाळा, कस्तुरबा गांधी विद्यालय, अभिनव विद्यालय आदी सर्व शाळेतील सुमारे पाच ते सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. फेरीत नगराध्यक्ष लोहगावकर, मुख्य अधिकारी डा.ॅ चेतना मानुरे -केरूरे, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, गटनेते समीर पाटणकर (भाजपा), गटनेत्या मंगला आराधी (शिवसेना), आरोग्य सभापती विष्णू दोबाडे, पाणीपुरवठा सभापती शिल्पा रामायणे, बांधकाम सभापती दीपक गिते, कैलास चोथे, भारती बदादे, सदस्य सायली शिखरे, माधवी भुजंग, त्रिवेणी तुंगार, कल्पना लहांगे,अनिता बागुल, सागर उजे, शीतल उगले, संगीता भांगरे, अशोक घागरे आदींसह शाळा-विद्यालयाचे शिक्षक, पालिका अधिकारी अरु ण गरूड, संजय मिसर, हिरामण ठाकरे, मधुकर माळी, राठोड संजय पेखळे, शशिकांत भालेराव, सुभाष सोनवणे, सागर गायकवाड आदी उपस्थित होते.
त्र्यंबक नगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 11:48 PM
त्र्यंबकेश्वर : राष्टÑपिता महात्मा गांधी जयंती व स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतर्फे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयात स्वच्छ सर्वेक्षणाबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देमहिला बचतगट व शालेय विद्यार्थी आदींच्या श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.