सिडको : प्रभागात ठिकठिकाणी साचलेला कचरा, उद्यानांमधील तुटलेल्या खेळणी, परिसरात वाढलेले गाजरगवत, संभाजी स्टेडियमची झालेली दुरवस्था, चुंचाळेतील घरकुलला लागलेली घरघर तसेच ओस पडलेल्या मनपाच्या वास्तू आदींची झालेली वाताहतबाबत पाहणी करताना महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. येत्या आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही यावेळी महापौर भानसी यांनी दिले.प्रभागातील समस्यांची पाहणी करण्यासाठी गुरुवारी सिडको प्रभाग २७ मध्ये महापौरांचा पाहणी करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांच्या दौºयाचे आयोजन करण्यात आले होते. या दौºयाचा शुभारंभ पाथर्डीफाटा येथून करण्यात आला. या दौºयात महापौर रंजना भानसी, मनपा सभागृह नेते दिनकर पाटील, प्रभाग सभापती हर्षा बडगुजर, प्रभागाचे नगरसेवक राकेश दोंदे, कावेरी घुगे तसेच भगवान दोंदे, विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत आदी सहभागी झालेहोते.यावेळी राजे संभाजी स्टेडियममधील जॉगिंग ट्रॅकवर धूळ, खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्थाही नाही याबरोबरच वीर सावरकर उद्यानातील तुटलेल्या खेळ्ण्या, वाढलेले गाजरगवत, सभामंडपाची झालेली दुरवस्थेबाबत पाहणी केली. यानंतर प्रभागातील स्वामी समर्थ उद्यानातील बंद पडलेला कारंजा, पाण्याची गळतींचीही पाहणी करताना अधिकाºयांना महापौरांनी जाब विचारलातसेच यानंतर स्वामी समर्थ रुग्णालयात औषधांचा तुटवडा, चुंचाळे येथील घरकुलला लागलेली घरघर, दत्तनगर येथील शाळेच्या समस्यांबाबतची पाहणी करण्यात आली.उद्यान विभागासह सर्वच विभागांचे कामकाज चांगले नसल्याने येत्या आठ दिवसांत कामकाजात सुधारणा करावी अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचे महापौर व सभागृहनेत्यांनी अधिकाºयांना सांगितले.तातडीने औषधेउपलब्ध करावीतमहापालिकेच्या मोरवाडी रुग्णालयाच्या ठिकाणी आठ दिवसांपासून खोकल्याचे औषधच उपलब्ध नसल्याचे या दौºयात आढळले. ऐन रोगराईच्या काळात औषधे नसल्याने प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून देण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. सिंहस्थनगर व श्री स्वामी समर्थ उद्यानाची स्वच्छता करावी, तेथील बोअरवेलची दुरुस्ती करावी, संभाजी स्टेडियममागील गाळ्यांचे लिलाव करावेत यांसह अन्य विविध विषयांवर कार्यवाहीचे आदेश भानसी यांनी दिले आहेत. महापौरांना केराची टोपली भेट देण्याचा प्रयत्न फसला सिडको : सिडको प्रभागात स्वाइन फ्लू, डेंग्यूसह साथीचे आजार बळावलेले असतानाही ठिकठिकाणी घाण व कचरा साचलेला असून, गाजरगवतही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. परिसरात नियमित स्वच्छता केली जात नाही यातच दिवाळी सणाला सुरुवात झाल्यानंतरही स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नसल्याचे चित्र बघावयास मिळाले. गुरुवारी (दि.१) महापौरांनी स्वच्छता व इतर समस्यांच्या पाहणीसाठी अधिकाºयांसमवेत पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौºयात सिडको भागातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न असताना याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महापौरांना केराची टोपली भेट देण्याचा प्रयत्न केला, परंतु महापौरांनी तेथून काढता पाय घेतल्याचा आरोप शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मंदा दातीर यांनी केला. सिडको प्रभाग २७ मध्ये गुरुवारी महापौरांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौºयात महापौर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील, सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर, विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, प्रभागाचे नगरसेवक राकेश दोंदे, कावेरी घुगे आदी सहभागी झाले होते. या पाहणी दौºयात महापौरांना प्रभाग २७ सह सिडको प्रभागातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचे आढळून आले. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ऐन सणासुदीच्या दिवसातही प्रभागात स्वच्छता होत नसल्याने महिला जिल्हाप्रमुख मंदा दातीर यांनी प्रभागातील महिलांना बरोबर घेत महापौरांना स्वच्छता होत नसल्याने केराची टोपली भेट देऊन निषेध करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी मंदा दातीर यांनी अंबड गावात तयारी केली, परंतु महापौर अंबड गावात न जाता चुंचाळे येथील घरकुलांकडे त्यांनी दौरा वळविला. यामुळे दातीर यांनी महिलांना बरोबर घेत दत्तनगरमध्ये महापौरांची भेट घेण्याची ठरविले. परंतु महापौरांनी तेथूनही काढता पाय घेतल्याचा आरोप मंदा दातीर व शरद दातीर यांनी केला.शहराच्या तुलनेत सिडको व अंबड भागात डेंग्यू , स्वाइन फ्लूसदृश तसेच साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून, यास महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, अधिकाºयांवर सत्ताधाºयांचा अंकुश नाही. स्वच्छतेच्या प्रश्नाबाबत गांभीर्याने न घेतल्यास यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडणार.- मंदा दातीर, जिल्हाप्रमुख, शिवसेना महिला आघाडी.
सिडकोत स्वच्छतेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 1:39 AM
सिडको : प्रभागात ठिकठिकाणी साचलेला कचरा, उद्यानांमधील तुटलेल्या खेळणी, परिसरात वाढलेले गाजरगवत, संभाजी स्टेडियमची झालेली दुरवस्था, चुंचाळेतील घरकुलला लागलेली घरघर तसेच ओस पडलेल्या मनपाच्या वास्तू आदींची झालेली वाताहतबाबत पाहणी करताना महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. येत्या आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही यावेळी महापौर भानसी यांनी दिले.
ठळक मुद्देपाहणी दौरा : आठ दिवसांत कामे मार्गी लावण्याचे आदेश