नाशिकरोड : अवघ्या पंधरा दिवसांवर पावसाळा ऋतू येऊन ठेपला असून, त्यानिमित्त नाशिकरोड विभागात मनपाकडून जेसीबीच्या साह्याने नाले व गटारी साफसफाई व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.नाशिकरोड जयभवानीरोड- सुंदरनगर, वडनेर दुमाला, लोटस हॉटेल, विहितगाव, बागुलनगर, देवी चौक, सुभाषरोड, सिन्नरफाटा, वास्तुपार्क, औटे मळा, प्रसाद धुनी, केळकरवाडी, चेहेडी, भारतभूषणनगर, ब्रिजनगर, आम्रपाली झोपडपट्टी आदी परिसरात सुमारे १२ किलोमीटर लांबीचे उघडे नाले व गटारी आहेत. नाल्यातील पाणी वाहून गेल्यानंतर राहिलेला गाळ माती झाला आहे. त्यामुळे नाल्याची रुंदी व खोली मातीमुळे कमी झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नाला भरून वाहण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मनपा बांधकाम विभागाकडून जेसीबीच्या साह्याने नाशिकरोड भागातील सर्व उघड्या नाल्यांची साफसफाई व स्वच्छता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे नाल्याची खोली व रुंदी वाढणार आहे.
मनपाच्या वतीने नाले सफाई मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:33 AM