शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जिल्हाभरात स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:57 PM

मानवतावादी शिकवणद्वारे निरपेक्ष भूमिकेतून समाजोपयोगी, समाजहिताचे उपक्र म राबविणारे रायगड जिल्ह्यातील रेवदंडा (ता. अलिबाग) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फेरविवारी (दि.१६) सकाळी नाशिक शहर व जिल्हा, जिल्ह्याबाहेरही स्मशानभूमी, दफनभूमी मुस्लीम, ख्रिस्ती कब्रस्तान स्वच्छता अभियान राबवून एक आगळावेगळा उपक्रम समाजासमोर उभा केला. यातून सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविले.

नाशिक : मानवतावादी शिकवणद्वारे निरपेक्ष भूमिकेतून समाजोपयोगी, समाजहिताचे उपक्र म राबविणारे रायगड जिल्ह्यातील रेवदंडा (ता. अलिबाग) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फेरविवारी (दि.१६) सकाळी नाशिक शहर व जिल्हा, जिल्ह्याबाहेरही स्मशानभूमी, दफनभूमी मुस्लीम, ख्रिस्ती कब्रस्तान स्वच्छता अभियान राबवून एक आगळावेगळा उपक्रम समाजासमोर उभा केला. यातून सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविले.या स्वच्छता अभियानमध्ये सुमारे ५२ एकर क्षेत्रात १ हजार ६९३ सदस्यांनी ८१ टन घनकचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. एकूण ४९ स्मशानभूमी, मुस्लीम कब्रस्तान, ख्रिस्ती दफनभूमी येथे स्वच्छता अभियान राबवले. समाजहिताचा विचार करत असता नाशिक जिल्ह्यात असा वेगळा उपक्रम राबविण्यात आला व तो यशस्वीरीत्या पूर्ण केला. नाशिक शहरासह येवला, निफाड, नैताळे, लासलगाव, सुरगाणा, वणी, ओझर, घोटी, इगतपुरी, संगमनेर, लोणी, राहाता, कोपरगाव, अकोले, त्र्यंबकेश्वर, कळमुस्ते, हातलोंढी आदी ठिकाणी स्मशानभूमी, दफनभूमी, कब्रस्तान येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुस्लीम समाजबांधवांनीही आजपर्यंत आमच्यासाठी सेवा करण्याचा विचार कोणी केला नसेल पण हा आदर्श डोळ्यासमोर आप्पासाहेबांनी उभा करून दिला, अशा भावना व्यक्त केल्या. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला आम्ही सर्व समाजबांधव शुभेच्छा देतो व भविष्यात अशा उपक्रमात आमचाही सहभाग देऊ, असे याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी बोलून दाखविले. अभियानासाठी लागणारे साहित्य प्रतिष्ठानतर्फेपुरवण्यात आले. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे सर्वधर्मीयांच्या स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान उपक्रम राबवून समाजासमोर सामाजिक एकात्मतेचा आदर्श उभा केला.

टॅग्स :NashikनाशिकSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान