बॉश कंपनीतर्फे गोदाघाटाची स्वच्छतासातपूर : येथील बॉश कंपनीच्या वतीने गंगाघाट तपोवन परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर चकाचक करण्यात आला. कुंभमेळ्यात आरोग्याच्या समस्या आणि साथीचे आजार उद्भवू नये, याची काळजी घेण्याचे आवाहन कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले.बॉश (मायको) कंपनीच्या वतीने जानेवारी महिन्यापासून शहरातील विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत तपोवन साधुग्राम परिसरात कंपनीचे उपाध्यक्ष सुधीर येवलेकर, मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक मोहन पाटील, मुकुंद भट, समीर आठवले आदि मान्यवरांच्या उपस्थित विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रास्ताविक प्रशिक्षण केंद्र व्यवस्थापक एस. एस. नेगी यांनी केले. स्वागत अनंत दांडेकर यांनी केले. सूत्रसंचालन रविकांत शार्दुल यांनी केले. प्रशांत घंगाळे यांनी आभार मानले. या मोहिमेत प्रशिक्षणार्थी आणि व्यवस्थापनाचे अधिकारी सहभागी झालेत. (वार्ताहर)शहर स्वच्छतेसाठी प्रयत्नांचे आवाहन४या मोहिमेत बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी भीमराव गवारी, विलास सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारीही सहभागी झाले होते. प्रारंभी बॉश व्यवस्थापनाच्या वतीने वरिष्ठ अधिकारी शैलजा बंड यांनी या मोहिमेची माहिती दिली. सामान्य नागरिकांनीदेखील आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
बॉश कंपनीतर्फेगोदाघाटाची स्वच्छता
By admin | Published: August 03, 2015 10:59 PM