सटाणा : येथील लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलतर्फे पोषण आहार व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता मिशन रॅली काढण्यात आली. रॅलीत विद्यार्थ्यांनी केलेली स्वच्छता विषयक जनजागृतीपर घोषणाबाजी व तहसील आवरात राबविलेले स्वच्छता अभियान हे प्रमुख आकर्ष ठरले.मुख्याध्यापक ए. डी. सोनवणे यांच्या हस्ते रॅलीचा प्रारंभ झाला. पालिकेचे आरोग्य सभापती दिपक पाकळे, नगरसेवक महेश देवरे, शालीग्राम कोर, उपमुख्याध्यापक के. टी. बोटवे, पर्यवेक्षक डी. डी. पगार आदी उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गावर स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात विद्यार्थी, शिक्षक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वच्छता स्वच्छता अभियान राबविण्यात आले.दरम्यान, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शाळेतर्फे स्वच्छतेसाठी विविध कार्यक्र म घेण्यात आले. यु. टी. जाधव व एस. एस. कदम यांनी विद्यार्थ्यांना सकस आहार व परिसर स्वच्छते तर उपशिक्षक ए. एस. पाटील व एच. एम. कोर यांनी हात धुण्याचे फायदे व तोटे यासंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. इयत्ता आठवी ते दहावी च्या विध्यार्थ्यांकरिता आयोजित ‘स्वच्छ भारत’ या विषयावरील निबंध व चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला.यावेळी शेखर दळवी, एस. डी. पाटील, अरु ण भामरे, सचिन सोनवणे, एच.डी. गांगुर्डे, एन. जे. जाधव, एस.डी. मगर, पी. डी. कापडणीस, एम. डी. निकुंभ, एस. आर. भामरे, ए. ए. बिरारी, बी. टी. वाघ, जयश्री अिहरे, वैशाली कापडणीस, पी. एस. सोनवणे, डी. डी. भामरे, जी. एन. सोनवणे, सी. डी. सोनवणे, व्ही. के. बच्छाव, वाय. एस. भदाणे, आर. डी. शिंदे, एस.व्ही. भामरे आदींसह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.