शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
3
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
4
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
5
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
6
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
7
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
8
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
9
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
10
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
11
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
14
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
15
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
16
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
17
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
18
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
20
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-

मनपा निवडणुकीचा मार्ग मोकळा

By admin | Published: January 05, 2017 2:09 AM

प्रभागरचना : न्यायालयाने स्थगिती उठविली

 नाशिक : महापालिकेच्या प्रभाग रचनेला स्थगिती देणारा जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महापालिकेने तयार केलेली प्रभाग रचना सदोष असल्याच्या कारणावरून दाखल झालेल्या दाव्यासंदर्भात जिल्हा सत्र न्यायालयाने प्रभाग रचना ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर ४ जानेवारीस सुनावणी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती केतकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होऊन न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश उठवत महापालिकेला निवडणूक प्रक्रिया राबविण्यास परवानगी दिल्याची माहिती विधी विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनी दिली. उच्च न्यायालयात महापालिकेने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी प्रतिपक्षाचे वकील हजर न राहिल्याने न्यायालयाने एकतर्फी निकाल देत याचिका निकाली काढली. तसेच निवडणूक प्रक्रियेत यापुढे काही अडचणी उद्भवल्यास पुन्हा उच्च न्यायालयाच्या संबंधित खंडपीठाकडेही येण्याचे निर्देश महापालिकेला दिले. महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. एम. एल. पाटील यांनी काम पाहिले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, मतदार यादी प्रसिद्ध करण्याबरोबरच आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेसाठी प्रभाग रचना घोषित करण्यात आल्यानंतर हर्षल जाधव यांनी नाशिकच्या दिवाणी न्यायालयात सदोष प्रभाग रचना असल्याचा दावा केला होता. परंतु उच्च न्यायालयाने दोनदा खालच्या न्यायालयाने दिलेले आदेश रद्दबातल ठरविले. (प्रतिनिधी)