ठळक मुद्देतपमान वाढल्याने उन्हाची तीव्रता वाढली
वणी : परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व विजेचा कडकडाट अशा वातावरणात हलकासा पाऊस झाला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमान कमालीचे वाढले आहे.
सुमारे ३८ डिग्री इतके तपमान वाढल्याने उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले. अगोदरच कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती त्यातून घराबाहेर जाण्यावर निर्बंध, त्यात कडक ऊन याचा सामना करताना नागरिक त्रस्त झाले होते. त्यात सध्या वातावरणात कमालीचा बदल झाला. अचानक आकाशात ढग जमा झाले. वादळी वारा, विजेचा कडकडाट व हलक्या स्वरुपाच्या पावसामुळे वातावरण काहीस बदल झालेला तसेच विजेचा लपंडाव सुरू होता. दरम्यान, वातावरणातील उष्णता काहीशी कमी झाल्याचे जाणवले.