नाशिक : वडाळागाव परिसरात दिपावली सणापासून सार्वजनिक स्वच्छतेचे तीनतेरा झाले आहे. स्वच्छता विभागाकडून काही ठराविक भागातील ‘निवड’लेल्या रस्त्यांवरच झाडू लगावला जात असल्याने अन्य परिसरात बकालपणा पहावयास मिळत आहे. घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून पुन्हा ‘ब्लॅक स्पॉट’निर्मितीला हातभार लावला जात आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने अस्वच्छतेत भर पडू लागली आहे.वडाळागाव परिसर नेहमीच स्वच्छतेच्या कारणावरून चर्चेत राहत आला आहे. सध्या वडाळागावातील रस्त्यांची पुरती वाट लागल्याने सफाई कर्मचा-यांना ‘झाडू’ लगावताना अडचण निर्माण होत आहे. जे रस्ते सुस्थितीत आहे, त्या रस्त्यांवर सफाई कर्मचा-यांक डून स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. गावातील मुख्य रस्त्यांपैकी सिध्द हनुमान मंदीर ते खंडेराव चौक, जय मल्हार कॉलनी, रझा चौक, राजवाडा या भागात कर्मचारी सकाळच्या प्रहरी झाडू लगावताना दिसतात; मात्र गावातील उर्वरित भागात स्वच्छता केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
तैबानगर, रामोशीवाडा, झीनतनगर, गणेशनगर, मदिनानगर, गरीब नवाज कालनी आदि भागांमध्ये मागील दोन महिन्यांपासून सफाई कर्मचारी फिरकलेच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसामुळे सफाई कर्मचारी येत नसावे, असा अंदाज नागरिकांनी बांधला; मात्र पावसाने उघडीप देऊन दोन आठवडे लोटले तरीदेखील कर्मचाºयांकडून रस्त्यांची स्वच्छता केली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.गरीब नवाज कॉलनीच्या मोकळ्या भुखंडाच्या संरक्षकभींतीभोवती मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. साचलेले सांडपाणी, कचºयाचे ढीग यामुळे बकालपाणा आला आहे. भुखंडाच्या दोन्ही बाजूने कचरा रस्त्यालगत पडून राहत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. घंटागाडी कर्मचा-यांकडून केवळ नागरिकांच्या डब्यातील कचरा संकलित केला जातो; मात्र कॉलनीच्या रस्त्यालगत भुखंडाच्या भींतीला साचलेला ढीग स्वच्छ केला जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.स्वच्छता अभियान राबविण्याची मागणीमनपा पुर्व विभागाकडून संपुर्ण वडाळागाव भागात स्वच्छता अभियान राबविण्याची मागणी होत आहे. आरोग्य सभापतींच्या प्रभागाला लागून असलेल्या वड