भास्कर सोनवणे, घोटी : ‘मूकम् करोति वाचालम्, पंगुम् लंघयते गिरीम्’अर्थात, इच्छा असेल तर कुठलेही काम अशक्य नाही. या सुभाषिताचा प्रत्यय अंध आणि दिव्यांग बांधवांनी इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई शिखरावर चढाई करुन आणून दिला आहे. मंगळवारी (दि.१) पहाटेच कळसूबाई शिखरावर चढून नववर्षाचे सूर्यदर्शन घेतले आणि कळसूबाईची विधिवत पूजा करून नववर्षात व्यसनमुक्तीचा संकल्प करण्यात आला. कळसुबाई मित्रमंडळाच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.३१ डिसेंबर २०१८ रोजी रात्रीच दिव्यांग बांधव कळसूबाईच्या शिखरावर मुक्कामी होते. मंगळवारी नववर्षदिनी सूर्याचे दर्शन होताच ‘भारत माता की जय’चा उद्घोष करण्यात आला. तंबाखू, दारू, सिगारेट आदी व्यसनांना तिलांजली देऊन व्यसनमुक्तीचा संकल्प केला. यासह परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. गिर्यारोहक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली कळसूबाई शिखरावर साफसफाई करून देवीचा अभिषेक करण्यात आला. वर्षभर मंडळाच्या गिर्यारोहकांकडून लोकोपयोगी उपक्र म राबवण्यात येत असतात. कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, संतोष म्हसणे, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, काळू भोर, बालाजी तुंबारे, प्रशांत जाधव, गजानन चव्हाण, बबलू बोराडे, विकास जाधव, निलेश आंबेकर, किसन दराने, प्रदीप काकुळते, रमेश हेमके, प्रशांत येवलेकर, ज्ञानेश्वर मांडे, निलेश पवार आदी उपस्थित होते.नववर्षाचे आशादायक स्वागतकळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबवत नववर्षाचे आशादायक स्वागत केले. अंध आणि दिव्यांग बांधवांनी धाडसीपणाने आम्हाला साथ दिली. अविस्मरणीय स्वागत करायला आनंद वाटला. व्यसनमुक्तीसाठी आम्ही झपाटून काम करण्याचा संकल्प केला आहे.- भगीरथ मराडे, अध्यक्ष, कळसुबाई मित्रमंडळ
दिव्यांगाकडून कळसूबाई शिखरावर चढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 3:48 PM
पंगुम् लंघयते गिरीम् : व्यसनमुक्तीचा संकल्प करत नववर्षाचे स्वागत
ठळक मुद्देनववर्षदिनी सूर्याचे दर्शन होताच ‘भारत माता की जय’चा उद्घोष करण्यात आला.