सातपूर : वर्षभरापूर्वी सिन्नर औद्योगिक वसाहतीत सुरू करण्यात आलेल्या ईएसआयसी रु ग्णालयात पुरेशा सुविधा मिळत नसल्याने ते बंद करावे किंवा सिन्नरसाठी स्वतंत्र रु ग्णालय सुरू करावे, अशी संतप्त मागणी कामगारांबरोबरच निमानेदेखील केली आहे. ईएसआयसी रु ग्णालयाबाबत कामगारांच्या सततच्या तक्र ारींची दखल घेत निमा सिन्नर कार्यालयात कर्मचारी राज्य विमा निगमचे उपसंचालक एस. के. पांडे, सामाजिक सुरक्षा अधिकारी सुदीप वाजपेयी यांचे समवेत निमा पदाधिकाºयांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष आशिष नहार, चिटणीस सुधीर बडगुजर, प्रवीण वाबळे, एस. के. नायर आदींनी सविस्तर चर्चा केली. वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ईएसआयसी रु ग्णालयात कामगारांसाठी मंजूर असलेल्या सुविधा मिळत नाहीत. पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध नसतो. समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. कर्मचारीही चुकीची वागणूक देत आहेत. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून, औषधोपचार मिळत नसतील तर रु ग्णालय बंद करून टाकावे, अशी भावना कामगारांमध्ये असल्याची भावना निमा पदाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांकडे केली. ईएसआयसी रु ग्णालयाबाबत कामगारांमध्ये भ्रमनिरास झाला आहे. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ उपचार मिळाले पाहिजेत आणि सिन्नरसाठी स्वतंत्र रु ग्णालय सुरू करण्याची मागणी निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार यांनी यावेळी केली. याप्रसंगी राहुल शुक्ला, समाधान बोडके, राजू डोळे, सुधाकर भदाने, निनाद कदम, गणेश बोडके, अविनाश पाठक, बी. टी. नेहे आदींसह उद्योजक उपस्थित होते.
सिन्नरमधील ईएसआयसी रुग्णालय बंद करा ! कामगार, उद्योजकांची मागणी : सुविधाच नसल्याने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:54 AM
सातपूर : सिन्नर औद्योगिक वसाहतीत सुरू करण्यात आलेल्या ईएसआयसी रु ग्णालयात पुरेशा सुविधा मिळत नसल्याने ते बंद करावे अशी संतप्त मागणी कामगारांबरोबरच निमानेदेखील केली आहे.
ठळक मुद्देनिमा पदाधिकाºयांची बैठक रु ग्णालयाबाबत कामगारांमध्ये भ्रमनिरास