शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

बिलावरील मीटरच्या रीडिंगची फोटो पद्धत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 4:19 PM

ओझर : वीजबिलाबाबत तसेच मीटर रीडिंगबाबतची अद्ययावत माहिती ग्राहकांना आता थेट मोबाइल क्रमांकावर मेजेसद्वारे पाठविली जाणार आहे. आलेला मेजेस दाखवून बील भरण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्दे वीजग्राहकांना मोबाइलवर मीटर रीडिंगची माहिती

ओझर : वीजबिलाबाबत तसेच मीटर रीडिंगबाबतची अद्ययावत माहिती ग्राहकांना आता थेट मोबाइल क्रमांकावर मेजेसद्वारे पाठविली जाणार आहे. आलेला मेजेस दाखवून बील भरण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दि. १ फेब्रुवारीपासून बिलावरील मीटर रीडिंगचा फोटो देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय वितरणने घेतला असून, ग्राहकांनी आपला मोबाइल क्र मांक व इतर आवश्यक माहितीची महावितरणकडे नोंद करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. ग्राहकांना वीज मीटर रीडिंगची अचूक माहिती मिळावी म्हणून देशात महावितरणने सर्वप्रथम बिलावर मीटर रीडिंगचा फोटो छापण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदाही होत होता. मात्र यात बील तयार झाल्यानंतर ग्राहकांना रीडिंगचा फोटो उपलब्ध होत होता. आता ज्या ग्राहकांनी आपल्या मोबाइल क्र मांकाची नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांना महावितरणसंबंधीच्या विविध सेवांची अद्ययावत माहिती मेजेसद्वारे दिली जाते आहे. त्यामुळे ग्राहकांना मीटर रीडिंग घेताक्षणी मोबाइलवर माहिती मिळत आहे. परिणामी ग्राहकांना आपले मीटर रीडिंग पडताळणीसाठी उपलब्ध राहील. तसेच रीडिंगमध्ये काही तफावत आढळल्यास ती टोल फ्री क्र मांक अथवा नजीकच्या कार्यालयात संपर्क साधून दुरुस्त करता येणे शक्य होईल.फोटो मीटर रीडिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून चालू महिन्यातील मीटरचा फोटो पाहण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर सुविधा उपलबध करून देण्यात येणार आहे. तसेच मीटरचा फोटो न छापल्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागेवर बिलासंबंधी पूरक माहिती देण्यात येणार आहे.ग्राहकांनी महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्र मांकावर आपला मोबाइल क्रमांक नोंदवायचा आहे. अशी माहिती टाइप करून सदर क्रमांकावर मेजेस केल्यानंतर आपला मोबाइल क्र मांकाची नोंदणी होणार आहे. याशिवाय २४३७ सुरू असणाºया कॉल सेंटरच्या १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ या टोल फ्रीक्र मांक उपलब्ध आहे. तसेच संकेतस्थळावरून किंवा महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे ग्राहकांना आपल्या मोबाइल क्र मांकाची नोंदणी करता येणार आहे.आतापर्यंत सुमारे दोन कोटी सात लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी मोबाइल क्र मांकाची नोंदणी केली आहे. उर्वरित ग्राहकांनीही महावितरण सेवेचा लाभ घेण्यासाठी मोबाइल क्र मांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.