येवला : आधारभूत किंमत योजनेंर्तगत सुरु असलेली शासकीय मका खरेदी योजना गुदामाअभावी तूर्त बंद करण्यात आली आहे. येवला तहसील कार्यालयाकडून मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध झाल्यानंतर ज्या मका उत्पादक शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे , अशा शेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होणार असल्याचे येवला तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भागुनाथ उशीर यांनी सांगितले. मका खरेदीसाठी उपलब्ध झालेले गुदाम पूर्ण क्षमतेने भरल्याने मका खरेदी रखडली आहे. खरेदीच्या प्रतीक्षेत असलेली मका आणखी किती दिवस सांभाळायचा, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.४ डिसेंबर २०१७ ला सुरु झालेल्या शासकीय मका खरेदी योजनेंर्तगत एमआयटी कॉलेज धानोरा ता. येवला येथील गुदामात ६५०९ क्विंटल, तर एसएनडी कॉलेज येवला येथील गुदामामध्ये १०९९४.५० क्विंटल अशा एकूण १७५०३.५० क्विंटल मका दि. १२ जानेवारीअखेर खरेदी झालेला आहे. दोन्हीही गुदामे पूर्णक्षमतेने भरल्याने तहसील कार्यालयाकडून गुदाम उपलब्ध होईपर्यत मका खरेदी तूर्तास बंद आहे. १७५९ आॅनलाइन नोंदणीधारक शेतकºयांपैकी ४३५ नंबरपर्यंतच्या शेतकºयांना माल विक्रीसाठी आणण्याच्या सुचना दिल्या असुन, त्या पैकी ३७५ शेतकºयांनी मका विक्र ी केली आहे.गुदामाअभावी मका खरेदी केंद्र बंद होऊ नये याकरिता येवला तालूका खरेदी विक्र ी संघाने ८ दिवसांपूर्वीच गोदाम उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन येवला तहसील कार्यालयात दिले असुन गोशाळा पांजरपोळ येवला, एमआयटी कॉलेज धानोरा, कृउबा उपबाजार अंदरसुल व पाटोदा यापैकी कुठेही मका खरेदी केंद्र लवकर सुरु व्हावे अशी मागणी मका उत्पादक शेतकरी वर्गाकडून होत आहे.खुल्या बाजारात मकाला १००० ते ११०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. शासकीय केंद्रावर मका विक्री केल्यास त्यातून सोसायटी कट केली जात असल्याचीही चर्चा परिसरात असल्याने शेतकºयांना इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मक्याबाबत नेमका काय निर्णय घ्यावा, असा संभ्रम शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. तालुक्यात अनेक शेतकºयांनी आॅनलाइन पद्धतीने मकाची नोंद केली असली तरी ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’ अशी काहीशी स्थिती या खरेदी केंद्रावर असल्याने शेतकºयांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मका साठवणुकीसाठी तहसील कार्यालयाकडे गुदामाची मागणी केली असून, गुदाम उपलब्ध होताच त्वरित मका खरेदी केंद्र सुरू होईल.- भागुनाथ उशीर, अध्यक्ष, खरेदी-विक्र ी संघ येवला१४ डिसें २०१७ अखेर मका विक्र ी झालेल्या शेतकºयांचे पेमेंट वर्ग झाले असून, ३१ डिसेंबर अखेरचे पेमेंट येत्या ४ ते ५ दिवसांत येणे अपेक्षित आहे. - बाबा जाधव, व्यवस्थापक, खरेदी-विक्र ी संघ येवलाआॅनलाइन मका नोंदणी करून महिना लोटला, परंतु धीम्या गतीने खरेदी सुरू आहे. तालुक्यात ४ ते ५ ठिकाणी केंद्र सुरु करून किमान नोंदणी झालेला मका लवकर खरेदी करावा.- सुभाष पहिलवान, पाटोळे, मका उत्पादक शेतकरी,येवला
येवल्यात मका खरेदी तूर्त बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:43 PM
येवला : आधारभूत किंमत योजनेंर्तगत सुरु असलेली शासकीय मका खरेदी योजना गुदामाअभावी तूर्त बंद करण्यात आली आहे. येवला तहसील कार्यालयाकडून मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध झाल्यानंतर ज्या मका उत्पादक शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे , अशा शेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होणार असल्याचे येवला तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भागुनाथ उशीर यांनी सांगितले.
ठळक मुद्देक्षमता संपली : गुदाम उपलब्ध झाल्यानंतर खरेदी होणार पूर्ववतशेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली मका साठवणुकीसाठी तहसील कार्यालयाकडे गुदामाची मागणी