शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दोन ठिकाणी मतदान यंत्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:25 AM

नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी सिडको भागातील नागरिक व मतदार स्वयंपूर्तीने मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभे असल्याचे दिसल्याने मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला.

सिडको : नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी सिडको भागातील नागरिक व मतदार स्वयंपूर्तीने मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभे असल्याचे दिसल्याने मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. सकाळी ७ वाजेपासून सिडकोतील प्रत्येक मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत होती, यातच सिडकोतील ग्रामोदय व मॉर्डन एज्युकेशन सोसायटी या दोन्ही शाळांमधील मतदान यंत्र सुमारे सव्वा तास तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणाने बंद होते. यामुळे मतदारांना याचा त्रास सहन करावा लागला.नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सिडको विभागातील शिवाजी चौक येथील मॉडर्न हायस्कूल, ग्रामोदय शाळा, रायगड चौक शाळा, गणेश चौकातील मनपा हायस्कूल, सर्वपल्ली राधाकृष्णन् शाळा या शाळांबरोबरच डीजीपीनगरच्या मीनाताई ठाकरे शाळा व विखे पाटील शाळेत, अंबड गाव येथील मनपा शाळांमध्ये सकाळपासूनच आबालवृद्ध मतदारांची गर्दी दिसून येत होती. सिडकोतील ग्रामोद्योग शाळेतील २१५ नंबरच्या केंद्रावर, तर लगतच्या मॉडर्न शाळेतील ११५ नंबरच्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्र हे सकाळी ७ वाजेपासून सुमारे सव्वा तास बंदच असल्याने याठिकाणी मतदारांची गर्दी झाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हे यंत्र बंद पडले होते़ सिडको परिसरात सरस्वती गुलाबराव पाटील (१००), सखुबाई नामदेव चुंभळे (१००), लक्ष्मीबाई नामदेव पांगरे (९४), लीलाबाई घमंडी (९२), कमल बोरसे (७७) दिव्यांग विनायक कासार (६२) यांच्यासह वयोवृद्ध, रु ग्ण यांनी स्वयंपूर्तीने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजाविला. विशेष म्हणजे यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती.दुपारी संथगतीने मतदानऔद्योगिक वसाहतीत काही कंपन्यांनी मतदानासाठी सुटी दिली असली तरी बहुतांश कामगारांना मतदानासाठी काही वेळाची सवतच मिळाली होती. त्यामुळे कामगारांनी कामाची वेळ सांभाळून सकाळी आणि सायंकाळी मतदान केले. यात पहिल्या शिप्टमधील कामगारांनी सायंकाळी, तर दुसऱ्या शिप्टमधील कामगारांनी सकाळी लवकर मतदान केल्याचे दिसून आले. जनलर शिप्टमधील बहुतांश कामगार सकाळच्या सत्रातच मतदान करताना दिसून आले. त्यामुळे दुपारच्या सत्रात संथगतीने मतदान झाल्याचे दिसून आले. यातच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वाढलेले तापमानामुळेही दुपाच्या वेळी मतदान करण्यासाठी येणाºया मतदारांची संख्या घटल्याचे दिसून आले.नाशिक पश्चिम मतदारसंघातील नवजीवन डे स्कूलच्या मतदान केंद्रावर सखी महिला केंद्राची उभारणी करण्यात आली होती. याठिकाणी असलेल्या ५५ नंबरच्या मतदान केंद्रावर सर्वच कर्मचारी या महिला होत्या. याठिकाणी येणाºया महिला मतदारांचे सकाळी गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक