सटाणा : शहरातील प्रभाग क्र मांक सहा मधील न्यू प्लॉट व गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेली शाळा इमारत शासकीय कार्यालयांना भाडेतत्वावर उपलब्द्ध करून देण्याबरोबरच शाळेलगत अपूर्णावस्थेत असलेल्या रस्त्यांचे काम तत्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी नगरसेविका रु पाली सोनवणे यांनी जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार यांना नुकतेच साकडे घातले.शहरातील न्यू प्लॉट परिसरातील शाळा क्र मांक एक व दोन या एकाच प्रांगणात आहेत.विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यामुळे येथील बारा खोल्यांची इमारत गेल्या काही वर्षांपासून बंद स्थितीत आहेत. त्यामुळे किरकोळ दुरु स्ती करण्यात येऊन या खोल्या शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सामाजिक वनीकरण आदी शासकीय कार्यालयांना भाडेतत्वावर दिल्यास इमारती वापरात येऊन वास्तू जीर्ण व भग्न होणार नाही. आणि परिसर स्वच्छ राहून जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वाढ होईल असेही सोनवणे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच शहरातून जाणाऱ्या ताहाराबाद रस्त्याला जोडणाºया रस्त्यांची देखील दुरवस्था झाली असून या ग्रामीण रस्त्यांचे नूतनीकरण करावे जेणेकरून दळणवळण सुरळीत होईल अशी मागणीहीे त्यांनी सभापती पगार यांच्याकडे केली.दरम्यान सभापती पगार यांनी न्यू प्लॉट व शाळा परिसराची पाहणी केल्यानंतर या बाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांच्याकडे अहवाल सादर केला असल्याचे त्यांनी सांगितले.
बंद शाळा इमारतीच्या वापरासाठी साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 4:44 PM
सटाणा : शहरातील प्रभाग क्र मांक सहा मधील न्यू प्लॉट व गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेली शाळा इमारत शासकीय कार्यालयांना भाडेतत्वावर उपलब्द्ध करून देण्याबरोबरच शाळेलगत अपूर्णावस्थेत असलेल्या रस्त्यांचे काम तत्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी नगरसेविका रु पाली सोनवणे यांनी जिल्हा परिषदचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार यांना नुकतेच साकडे घातले.
ठळक मुद्देसटाणा : शिक्षण, आरोग्य सभापती पगार यांची घेतली भेट