शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

घोरपडे बंधूंसह चौघांना कोठडी

By admin | Published: November 30, 2015 11:41 PM

घोटाळ्यात मुंबईच्या दोघांचा समावेश : फरार नसल्याचा वकिलांचा युक्तिवाद

नाशिक : कोट्यवधी रुपयांच्या रेशन धान्य घोटाळ्यातील गत सहा महिन्यांपासून फरार असलेल्या दोघा घोरपडे बंधूंसह अन्य दोघे संशयित रविवारी वाडीवऱ्हे पोलिसांना शरण आले़ या चौघांनाही विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश ऊर्मिला फलके जोशी यांनी ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ या प्रकरणातील पटेल नामक पाचवा संशयित शनिवारी न्यायालयास शरण आला असून, त्यास ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे़ तर उर्वरित तिघे संशयित अद्यापही फरार आहेत़रेशन धान्य घोटाळ्यातील संशयित संपत नामदेव घोरपडे, विश्वास नामदेव घोरपडे (रा़ १० विश्वास बंगला, गोविंदनगर, नाशिक), मगन रतन पवार, रमेश सोमनाथ पाटणकर (दोघेही रा़ शिवशक्ती चौक, सिडको) हे रविवारी वाडीवऱ्हे पोलिसांना शरण आले़ तर पाचवा संशयित लक्ष्मण धरमसी पटेल (रा़ किंगस्टोन बिल्डिंग, कल्याण पश्चिम) हा शनिवारी न्यायालयास शरण आल्याने त्यास ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ यातील प्रमुख सूत्रधार अरुण नामदेव घोरपडे, त्याची मुलगी पूनम पंकज होळकर (पिंपळगाव बसवंत) व जितूभाई विरजी ठक्कर (रा़ गरिमा टॉवर, ठाणे पश्चिम) हे तिघे फरार आहेत़विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, घोरपडे बंधूंनी संघटितपणे टोळी तयार करून सरकारी धान्याचा काळाबाजार करून प्रचंड पैसा कमावला आहे़या काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी दहा-अकरा बोगस कंपन्या स्थापन करून त्याद्वारे सुमारे १६५ कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत़ या गुन्ह्णाची पद्धत तपासणी, पत्नी व मुलांच्या नावे केलेल्या संपत्तीचा शोध, तसेच सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच अन्य आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी व तपासासाठी २० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली़ संशयितांचे वकील अ‍ॅड़ भानोसे, भाटे, देशपांडे यांनी पोलीस तपास पूर्ण झाल्याने कोठडीची गरज नसल्याचे व संशयित फरार झाले नसून जामिनासाठीच्या कायदेशीर तरतुुदींसाठी वेळ लागल्याचे सांगितले़ यावर अ‍ॅड़ मिसर यांनी संशयित फरार झाल्याने याच न्यायालयाने अटक वॉरंट, मालमत्ता जप्तीचे आदेश काढल्याचे तसेच विविध पोलीस ठाण्यांमध्ये हाणामारी, जिवे मारण्याचा प्रयत्न, जमीन व्यवहार फसवणूक व मोक्कान्वये गुन्हा दाखल असल्याचे सांगितले़ यावर न्यायालयाने या चौघा संशयितांना दहा दिवस अर्थात ९ डिसेंबरीपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले़ (प्रतिनिधी)