नाशिक : चांदवड टोल नाक्यावर पकडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील चौघांपैकी तिघा संशयितांची विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस़ आऱ शर्मा यांनी गुरुवारी (दि़ ४) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तर उर्वरित संशयित नागेश राजेंद्र्र बनसोडे (२३, रा. वडाळा, नाशिक) याच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली़ दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेला प्रमुख संशयित बद्रिनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमित ऊर्फ सुका पाचा याने नाशिकरोड कारागृहातील गँगस्टरकडून जिवाला धोका असल्याचा कांगावा न्यायालयात केला़उत्तर प्रदेशातील बांदा येथील एक शस्त्र विक्रीचे दुकान फोडून संशयित सुका पाचा व त्याच्या साथीदारांनी २ विदेशी बनावटीची पिस्तुले, १७ रिव्हॉल्व्हर, २५ रायफल्स आणि चार हजारहून अधिक काडतुसे चोरली़ यानंतर १५ डिसेंबर रोजी बोलेरो वाहनातून (एमएच ०१, एसए ७४६०) हा शस्त्रसाठा मुंबईला नेला जात असताना चांदवड टोल नाक्यावर पोलिसांनी पकडला व संशयितांना अटक केली़ यामध्ये सुका पाचा, नागेश बनसोडे, अमीर रफिक शेख, वाजिद अली फैयाज अली यांच्यासह एका अल्पवयीनाचा समावेश होता़ या प्रकरणातील चौघांवर मोक्कान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस कोठडीची मुदत संपल्याने या चौघांनाही गुरुवारी पावणेतीन वाजेच्या सुमारास विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले़ न्यायालयाने संशयितांकडे पोलिसांविषयी तक्रारीबाबत विचारणा केली असता त्यांनी तक्रार नसल्याचे सांगितले, मात्र त्यांच्या वकिलांनी पोलिसांनी बळजबरीने जबाब लिहून घेतल्याचे सांगितले़ यावर जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी सुमारे दीड तास युक्तिवाद करून आरोपीच्या वकिलांचे म्हणणे खोडून काढले़ या प्रकरणातील संशयित नागेश बनसोडे हा माहिती देत नसल्याने त्याच्या कोठडीची मागणी केली असता चार दिवसांची वाढ करण्यात आली़ तर उर्वरित सुका पाचा, अमीर शेख, वाजिद अली यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात केली़ पोलिसांनी या चौघाही संशयितांची सात दिवसांची पोलीस कोठडी राखून ठेवली असून, त्याचा योग्यवेळी वापर केला जाणार आहे़ तर चांदवड पोलिसांनी या संशयितांची ताबा मिळण्यासाठी केलेल्या विनंतीवर शुक्रवारी (दि़ ५) निर्णय होणार आहे़ दरम्यान, दिल्लीतील सायबर सेलचे अधिकाºयांनी संशयितांचे अनेक वर्षांचे मोबाइल फोनचे रेकॉर्ड सोबत नेले असून, त्यांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे़न्यायालयात संशयित पाचाचा कांगावाविशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलेल्या चौघांपैकी तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली़ यातील प्रमुख संशयित सुका पाचा याने नाशिकरोड कारागृहात आपल्या जिवाला धोका असल्याचा कांगावा केला़ यासाठी त्याने कारागृहात असलेल्या गँगस्टर व मुंबईच्या अंडरवर्ल्ड सिंगचा खून झाल्याचेही सांगितले़ मात्र, न्यायाधीशांनी कारागृहातील सुरक्षा यंत्रणा मजबूत असल्याचे सांगितले़
चांदवड टोल नाक्यावर पकडलेल्या शस्त्रसाठ्यातील संशयितांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:25 AM
नाशिक : चांदवड टोल नाक्यावर पकडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील चौघांपैकी तिघा संशयितांची विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस़ आऱ शर्मा यांनी गुरुवारी (दि़ ४) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़
ठळक मुद्देजिवाला धोका असल्याचा कांगावा विशेष मोक्का न्यायालयात हजर