केंद्र सरकारने ज्वेलरी इंडस्ट्रिजच्या शिखर संस्थेबरोबर चर्चा न करता एचयू आयडीद्वारे तपासणीची असंविधानिक किचकट अशी प्रणाली सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांवर लादली. हा जाचक निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी तहसीलदार व शहर पोलीस ठाण्यास दिलेल्या निवेदनात येवला सराफ सुवर्णकार असोसिएशन व राष्ट्रवादी काँग्रेस सुवर्णकार सेल यांनी केली आहे.
निवेदनावर रूपेश घोडके, गणेश पावटेकर, अमोल उदावंत, मोहन माडीवाले, शिरीष दुसाने, राजेंद्र माडीवाले, दत्ता माडीवाले, आनंद विभांडिक, दिनेश शेंडे, जयेश पावटेकर, सागर उदावंत, ज्ञानेश नाशिककर, दीपक नाशिककर, आदींसह सराफ व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो- २३ येवला सराफ
येवला येथे सराफ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून शासन निर्णयाचा निषेध केला.
230821\23nsk_33_23082021_13.jpg
फोटो- २३ येवला सराफयेवला येथे सराफ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून शासन निर्णयाचा निषेध केला.